सांगलीत लाच देणाराच लाचलुचपतच्या जाळ्यात, बालगृह संस्था चालकावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 03:12 PM2018-12-13T15:12:13+5:302018-12-13T15:13:58+5:30

खानापूर तालुक्यातील पारे येथील राजवर्धन पाटील मुलांचे बालगृहातील उघडकीस आलेल्या गैर कारभाराबाबत कारवाई न करण्यासाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांना दोन लाखाची लाच देणाऱ्या बालगृहाचा संस्थापक अजित सूर्यवंशी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

The Sanghit bribery is a bribe of the bribe, the action of the organization of the child organization | सांगलीत लाच देणाराच लाचलुचपतच्या जाळ्यात, बालगृह संस्था चालकावर कारवाई

सांगलीत लाच देणाराच लाचलुचपतच्या जाळ्यात, बालगृह संस्था चालकावर कारवाई

Next
ठळक मुद्देसांगलीत लाच देणाराच लाचलुचपतच्या जाळ्यात, बालगृह संस्था चालकावर कारवाईअजित सूर्यवंशी यास दोन लाख रुपयांची लाच देताना अटक

सांगली : खानापूर तालुक्यातील पारे येथील राजवर्धन पाटील मुलांचे बालगृहातील उघडकीस आलेल्या गैर कारभाराबाबत कारवाई न करण्यासाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांना दोन लाखाची लाच देणाऱ्या बालगृहाचा संस्थापक अजित सूर्यवंशी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या बालगृहाविषयी तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी या बालगृहावर छापा घातला होता. यावेळी त्या ठिकाणीचा गैरकारभार उघड झाला होता.

याबाबत कारवाई करण्यात येऊ नये यासाठी अजित सूर्यवंशी याने लाच देण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी दुपारी लाचेची एक लाख ९६ हजार रुपयांची लाच देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विभागाने त्याला रंगेहाथ पकडले.

Web Title: The Sanghit bribery is a bribe of the bribe, the action of the organization of the child organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.