स्वप्नील कुंभारकर बनला सांगलीचा पहिला ‘आयर्नमॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 04:07 PM2019-07-08T16:07:50+5:302019-07-08T16:09:55+5:30

सांगली : शारीरिक क्षमतेची लोखंडासारखी महाकठीण परीक्षा घेणाऱ्या ऑस्ट्रियामधील ह्यआयर्नमॅनह्ण स्पर्धेत बाजी मारत सांगलीच्या स्वप्नील कुंभारकर या खेळाडुने हा ...

Sanghani's first 'Ironman' became Swapnil Kumbharkar | स्वप्नील कुंभारकर बनला सांगलीचा पहिला ‘आयर्नमॅन’

स्वप्नील कुंभारकर बनला सांगलीचा पहिला ‘आयर्नमॅन’

googlenewsNext
ठळक मुद्देस्वप्नील कुंभारकर बनला सांगलीचा पहिला ‘आयर्नमॅन’वादळातही सायकलिंग : ऑस्ट्रियामध्ये पार पडली स्पर्धा

सांगली : शारीरिक क्षमतेची लोखंडासारखी महाकठीण परीक्षा घेणाऱ्या ऑस्ट्रियामधील ह्यआयर्नमॅनह्ण स्पर्धेत बाजी मारत सांगलीच्या स्वप्नील कुंभारकर या खेळाडुने हा किताब पटकाविला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसास तोंड देत त्याने वेळेत आव्हान पूर्ण केले. सांगलीतून असा किताब मिळविणारा कुंभार हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

रविवारी ७ जुलै रोजी युरोपमधील आॅस्ट्रिया देशातील क्लॅगनफर्ट शहरात ही आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन ही स्पर्धा पार पडली. स्वप्नील सत्यवान कुंभारकरने ही खडतर स्पर्धा ४१४ तास ५९ मिनिटे ०१ सेकंदात पुर्ण करून, सांगलीतील पहिला आयनमॅन होण्याचा मान मिळवला. आयर्नमॅन हा किताब, ट्रायथॉलोन या विभागात मोडतो.

या स्पर्धेत स्पर्धकास प्रथम ३.८ किलामिटर पोहणे, त्यानंतर १८० किलोमिटर सायकल चालवणे व त्यानंतर ४२.१९८ किमी ऐवढे (फुल-मॅराथोन) अंतर धावणे, हे सर्व सलगपणे १७ तासांच्या आत पुर्ण केल्यावरच, आयर्नमॅन हा किताब मिळतो.

ऑस्ट्रियामधील स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी ७ वाजून ४० मिनिटास स्पर्धा सुरु केली व रात्री १०.३९ वाजण्याच्या सुमारास ही स्पर्धा पुर्ण केली. स्वप्नीलने ३.८ किमी पोहण्यास १ तास ४३ मी, १८० किमी सायकलिंग करण्यास ७ तास २८ मिनिटे आणि ४२.१९८ किमी (फुल-मॅराथोन) अंतर धावण्यास ५ तास १६ मी. इतक्या वेळेत स्पर्धा यशस्वीपणे पुर्ण केली. प्रत्येक इव्हेंन्टनंतर कपडे व शूज बदलणे याचा ट्रान्झीशन टाईमसुध्दा या स्पर्धा पुर्ण करण्याच्या वेळेतच पकडला जातो.

सुमारे १०० किमी सायकलिंगचा टप्पा पूर्ण झाल्यावर स्पर्धेच्या ठिकाणी मोठे वादळ सुरू झाले व पावसाने स्पर्धा प्रचंड झोडपून काढण्यास सुरूवात केली. अशा खडतर नैसर्गिक आव्हानास सामोरे जात वेळ प्रसंगी सायकल हातात घेवून पळवत नेत त्याने स्पर्धा पूर्ण केली. इतक्या वाऱ्याच्या वेगात सायकल चालवता येणे शक्य नव्हते.

ऊन, वारा, पाऊस यातील कोणतीही गोष्ट स्पर्धा थांबवत नाही. अशा नैसर्गिक अडथळ्यातही वेळेचे मिटर चालूच राहते. नैसर्गिक आव्हानास तोंड देत त्याने ही स्पर्धा पुर्ण केली, अन्यथा स्पर्धा पूर्ण करण्याची वेळे आणखी कमी झाली असती. त्याच्या या यशाने सांगलीतील क्रीडा क्षेत्र भारावून गेले असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Web Title: Sanghani's first 'Ironman' became Swapnil Kumbharkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.