सलग पंचवीस वर्षे विना अपघात एसटी सेवा-भिवडीतील राजेंद्र कीर्दत यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 01:03 AM2019-02-10T01:03:58+5:302019-02-10T01:05:05+5:30

प्रत्येकजण वाऱ्याशी स्पर्धा करत गाड्या दामटतो. त्यातून अपघातांचे प्रमाण वाढ असल्याचे रस्ता सुरक्षा सप्ताहातून समोर आले; पण राज्य परिवहन महामंडळाच्या मेढा आगारातील चालक राजेंद्र कीर्दत याला अपवाद

Regardless of accidents in the twenty-five years of continuous service, Rajendra Kireedat of Bhiwadi | सलग पंचवीस वर्षे विना अपघात एसटी सेवा-भिवडीतील राजेंद्र कीर्दत यांचा गौरव

सलग पंचवीस वर्षे विना अपघात एसटी सेवा-भिवडीतील राजेंद्र कीर्दत यांचा गौरव

Next
ठळक मुद्देकाटेकोर तपासणी करून घेतात गाडी ताब्यात

जगदीश कोष्टी ।
सातारा : प्रत्येकजण वाऱ्याशी स्पर्धा करत गाड्या दामटतो. त्यातून अपघातांचे प्रमाण वाढ असल्याचे रस्ता सुरक्षा सप्ताहातून समोर आले; पण राज्य परिवहन महामंडळाच्या मेढा आगारातील चालक राजेंद्र कीर्दत याला अपवाद आहेत. त्यांच्या हातून २९ वर्षांत एकदाही अपघात झालेला नाही. त्यांच्याकडून इतरांनी प्रेरणा घ्यावी म्हणून त्यांचा नुकताच विशेष सत्कारही केला.

राजेंद्र कीर्दत हे एसटीमध्ये १९९१ मध्ये चालकपदी रुजू झाले. त्यांनी आतापर्यंत वाई, मेढा, सातारा आगारात सेवा दिली. ते ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या कारकिर्दीत त्यांनी पुणे, मुंबई, बीड, लातूर, नाशिक अशा लांब पल्ल्याच्या फेºयाही केल्या आहेत. मुंबईची फेरी घेतल्यास रातराणीचीच ड्यूटी असते; पण स्टेअरिंगवर बसल्यावर डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावतात. त्यामुळेच एसटीतील २९ वर्षांत त्यांच्याकडून कसल्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही. मानवी चुका व यांत्रिक बिघाड अपघातांना कारणीभूत असतात. त्यामुळे कीर्दत गाडी ताब्यात घेताना एसटीच्या सर्व टायरमधील हवा, हेडलाईट, प्रवासी लाईट व्यवस्थित आहे का, याची खात्री करतात. त्यानंतर आगारात एक फेरी मारून ब्रेक टेस्ट घेतात. नंतरच गाडी ताब्यात घेतात.

दुचाकीस्वारांनाही सावकास जाण्याचा सल्ला
त्याचप्रमाणे गाडी चालवितानाही वेग मर्यादा पाळतात. पाठीमागून एखादा तरुण दुचाकीवर सुसाट येत असेल तर स्वत:ची गाडी बाजूला घेऊन अगोदर रस्ता देतात; पण त्याचवेळी ‘सावकास जा...’ म्हणून आवाजही देतात. त्यामुळे दुचाकीस्वार गाडीचा वेग कमी करून पुढे जातो. वेगावर नियंत्रण असल्यामुळे तिकीट काढण्यासाठी वाहक उभा राहिला तरी त्याला कशाचा आधार घेण्याची गरजच नाही. अनेक प्रवासीही प्रवास संपल्यावर आवर्जून बोलतात,’ असा अनुभव वाहक डी. एस. करडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

सातारा जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष चालक
विना अपघात चालक
सलग वर्षे संख्या
३० —
२५ १
२० १
१५ ३
१० २
५ १६


एसटीमहामंडळाकडून विना अपघात सेवा बजावलेल्या चालकांची माहिती ठेवली जात असते.

Web Title: Regardless of accidents in the twenty-five years of continuous service, Rajendra Kireedat of Bhiwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली