सांगली - जूनमधील पाऊस ३२ मिलिमीटरने घटला : तीन वर्षातील सर्वात नीचांकी प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:04 AM2019-06-28T00:04:14+5:302019-06-28T00:05:01+5:30

यंदाच्या मान्सूनने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रदीर्घ काळ प्रतीक्षेत ठेवल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे.

Rainfall in June decreased by 32 millimeters | सांगली - जूनमधील पाऊस ३२ मिलिमीटरने घटला : तीन वर्षातील सर्वात नीचांकी प्रमाण

सांगली - जूनमधील पाऊस ३२ मिलिमीटरने घटला : तीन वर्षातील सर्वात नीचांकी प्रमाण

Next
ठळक मुद्देहवामानाच्या लहरीपणाने चिंतेचे ढग दाटले

अविनाश कोळी ।
सांगली : यंदाच्या मान्सूनने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रदीर्घ काळ प्रतीक्षेत ठेवल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. दुष्काळी तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्यात गतवर्षाच्या तुलनेत जून महिन्यातील पावसाचे प्रमाण ३२ मिलिमीटरने घटले असून तीन वर्षातील नीचांकी पावसाची नोंद झाली आहे.
पावसाअभावी यंदा शेतकरी अडचणीत आला आहे.

मान्सून विलंबाने आल्यानंतरही त्याचे प्रमाण समाधानकारक नाही. जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी, खानापूर, जत, कवठेमहांकाळ या भागात मान्सूनपूर्व पाऊस पडला असला तरी, तो समाधानकारक नाही. त्यामुळे दुष्काळी चटके अजूनही सोसावे लागत आहेत. दुष्काळी भागाला नेहमी मान्सूनपूर्व किंवा परतीचा पाऊस तारणारा ठरत असला तरी, यंदा मान्सूनपूर्व पावसानेही निराशा केली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील पेरण्यांचा खोळंबा झाल्याचे चित्र आहे.

जूनच्या दुसºया पंधरवड्यातच मान्सून दाखल झाला असून, अद्याप पावसाचा म्हणावा तसा जोर नाही. गेल्या तीन वर्षातील जून महिन्यातील पावसाची सरासरी पाहिली, तर यंदा तुलनेने सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी, तसेच जिल्ह्यातील नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यातील पावसावरच आता शेतकºयांची आशा जिवंत आहे. गेल्या काही वर्षांचा अभ्यास केला, तर या प्रत्येक वर्षी जुलैमधील पावसानेच जिल्ह्याला तारले आहे. या महिन्यात होणाºया पावसामुळे धरणे, तलाव व अन्य जलस्रोत भरले जातात. आॅगस्टमधील पावसानेही अनेकदा आधार दिला आहे, मात्र वारंवार हवामानाच्या लहरीपणाचा फटका जिल्ह्यातील नागरिकांना बसत आहे.

आटपाडी, तासगाव वगळता अन्यत्र घट
सांगली जिल्ह्याच्या तालुकानिहाय पावसाच्या शासकीय आकडेवारीनुसार, केवळ आटपाडी व तासगाव तालुक्यात गतवर्षापेक्षा जास्त पावसाची नोंद दिसून येते. २७ जून २0१८ रोजी आटपाडीतील एकूण पाऊस ३५ मि.मी. नोंदला गेला होता. त्याच तारखेला यावर्षी मात्र ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तासगावमध्ये गतवर्षी ३५.५ मि.मी.ची नोंद होती, यंदा ती १0४.५ मि.मी. झाली आहे.

आगामी आठवडा कमी पावसाचा
भारतीय हवामान खात्याने गुरुवारी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आगामी आठवडाही कमी पावसाचाच राहणार आहे. ३ जुलैपर्यंत वातावरणात फारसा फरक दिसणार नाही, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

तीन वर्षातील सरासरी पाऊस
(२७ जूनअखेरचा मि.मी.)
तालुका २0१९ २0१८ २0१७
मिरज ७१.२ ८२ २९
जत ११४.0५ ११५ २0४
आटपाडी ७३ ३५ १४0
क. महांकाळ ६७.२ ७0.७ १३६.४
पलूस २८ ८३ २३
कडेगाव ८९ १३९.३0 ५९
विटा ५७ १९३ ७५
तासगाव १0४.0५ ३५.५ ४६.५
शिराळा ८६ २१९ १0३


तीन वर्षात सर्वाधिक पाऊस २0१८ मधील जूनमध्ये नोंदला गेला होता.

Web Title: Rainfall in June decreased by 32 millimeters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.