पणुंब्रे वारुणला आरक्षणाने इच्छुकांचा अपेक्षाभंग

By Admin | Published: January 19, 2017 11:23 PM2017-01-19T23:23:18+5:302017-01-19T23:23:18+5:30

जिल्हा परिषद मतदारसंघात रंगणार राजकीय द्वंद्व : मणदूर पंचायत समितीसाठी घमासान, गटबाजीला आले उधाण

Pandumbre Varun's disapproval of want of reservation | पणुंब्रे वारुणला आरक्षणाने इच्छुकांचा अपेक्षाभंग

पणुंब्रे वारुणला आरक्षणाने इच्छुकांचा अपेक्षाभंग

googlenewsNext



बालेखान डांगे ल्ल चरण
शिराळा तालुक्यातील पणुंब्रे वारूण जिल्हा परिषद मतदार संघ काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पूर्वाश्रमीच्या आरळा मतदारसंघात बदल होऊन याची रचना झाली आहे. त्यातच महिला ओबीसी आरक्षण पडल्यामुळे मातब्बरांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत गटबाजीला उधाण आले आहे, तर भाजपतही इच्छुकांची मांदियाळी आहे.
मागील निवडणुकीत येथे माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख गटाने आमदार शिवाजीराव नाईक गटाला धूळ चारली होती. मनसे, शिवसेनेने तटस्थ भूमिका घेत राजकीय रंगत आणली होती. पणुंब्रे वारूण जिल्हा परिषद मतदार संघातील मणदूर पंचायत समिती गण खुला झाल्याने इच्छुकांना बळ आले आहे. पंचायत समितीसाठी गतवेळचीच राजकीय रणनीती काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीकडून आखली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भाजपमधील धुसफूस आता उमेदवारीच्या रूपाने बाहेर पडत आहे. चरण येथील आमदार शिवाजीराव नाईक यांचे कट्टर समर्थक बी. के. नायकवडी यांनी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचाराने रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षापेक्षा अपक्ष म्हणून लढण्याचे संकेत दिले आहेत. नायकवडी यांचा पवित्रा भाजपला मारक ठरणार असून, आमदार शिवाजीराव नाईक आणि नायकवडी यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र आहे.
भाजपचे तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांनी पक्षाचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याची भूमिका मांडून नायकवडी यांचे आव्हान संपुष्टात आणले आहे.
पणुंब्रे वारुण जिल्हा परिषद व मणदूर पंचायत समिती मतदार संघाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. मतदारसंघ काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने आ. नाईक यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
या राजकीय धुळवडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आवाज उंचावला आहे. येथे मनसे स्वबळावर लढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी सांगितले आहे. मनसेच्या या भूमिकेमुळे निवडणूक चौरंगी होणार असून, राज्याच्या सतेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारी शिवसेना मात्र येथे अस्तित्वहीन आहे.
पणुंब्रे वारुण जिल्हा परिषद गटासाठी काँग्रेसकडून अलका पांडुरंग सुतार, राष्ट्रवादीमधून निलोफर मुनीर डांगे, मनसेतून सुनीता सुतार, भाजपमधून लक्ष्मी नथुराम लोहार यांची नावे चर्चेत आहेत.
पंचायत समितीच्या पणुंब्रे गणासाठी भाजपमधून मोहन पाटील, शकील मुजावर, राष्ट्रवादीतून शिवाजी हाप्पे, जयवंत कडोले, काँग्रेसकडून सुभाष सुतार, अब्बास डांगे, अनिल लोहार, मनसेतून धोंडीराम सुतार यांची नावे चर्चेत आहेत.
मणदूर पंचायत समिती गणासाठी भाजपमधून प्रकाश जाधव, आनंदा पाटील, राजू नेर्लेकर, काँग्रेसमधून विलास पाटील, योगेश कुलकर्णी, हिंदुराव नांगरे, राष्ट्रवादीतून शिवाजी पाटील, विजय पाटील, सर्जेराव पाटील, मनसेतून दिनकर शिंदे, संजय पाटील आणि अपक्ष म्हणून बी. के. नायकवडी यांच्या नावांची चर्चा आहे.

Web Title: Pandumbre Varun's disapproval of want of reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.