‘सोशल मीडिया’वरून मनपा आयुक्तांबद्दल आक्षेपार्ह मजकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:57 PM2018-11-18T23:57:17+5:302018-11-18T23:58:00+5:30

सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याबद्दल शनिवारी रात्री सोशल मीडियावरुन (व्हॉटस्-अ‍ॅप) आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट टाकण्यात आल्याने प्रचंड ...

Offensive material about the Municipal Commissioner on 'Social Media' | ‘सोशल मीडिया’वरून मनपा आयुक्तांबद्दल आक्षेपार्ह मजकूर

‘सोशल मीडिया’वरून मनपा आयुक्तांबद्दल आक्षेपार्ह मजकूर

Next

सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याबद्दल शनिवारी रात्री सोशल मीडियावरुन (व्हॉटस्-अ‍ॅप) आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट टाकण्यात आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला.
ही पोस्ट टाकणाऱ्या संशयितास अटक करावी, या मागणीसाठी उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह सर्व अधिकारी-कर्मचाºयांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी आयुब पटेल (रा. सांगली) यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्याएका ग्रुपवरुन खेबूडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले. ही पोस्ट संशयित आयुब पटेल यांनी ‘व्हायरल’ केली. महापालिकेतील एका कर्मचाºयाच्या मोबाईलवर ही पोस्ट आली. संबंधित कर्मचाºयाने वरिष्ठ अधिकाºयांना याची माहिती दिली. त्यानंतर रात्री अकरा वाजता उपायुक्त पाटील यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पण पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील नव्हते. ठाणे अंमलदारांनी साहेब आल्याशिवाय मला तक्रार घेता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला. शेवटी तंत्र व्यवस्थापक (सिस्टिम मॅनेजर) नकुल जकाते यांनी फिर्याद दिली. यावर पोलिसांनी लेखी फिर्याद देण्याची मागणी केली. लेखी दिल्यानंतर ती पुन्हा आॅनलाईन दाखल करून घेण्यात आली. पण कोणत्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करायचा, यावरून मध्यरात्री दोनपर्यंत हा गोंधळ सुरू होता.

शासनाकडे तक्रार करणार
महापालिकेच्या अधिकाºयांची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यानंतर आपले सरकार या पोर्टलवर महापालिकेच्यावतीने तक्रार करण्यात आली. दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, महापौर, आयुक्त, विरोधी पक्षनेते, गटनेते यांनाही निवेदन देण्यात येणार आहे. महापालिका अधिकारी, कर्मचाºयांना त्रास देणाºयांविरोधात कारवाई करण्याची मागणीही केली जाणार आहे.
अदखलपात्र गुन्हा
पोलिसांनी पटेल यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करावी, या मागणीसाठी रविवारी सकाळी कर्मचाºयांनी पुन्हा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी पटेल यांना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून सोडून दिले आहे, असे सांगितले. दुपारी बारा वाजता कर्मचारी निघून गेले.

Web Title: Offensive material about the Municipal Commissioner on 'Social Media'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली