मदनभाऊ महाकरंडक नगरच्या ‘खटारा’कडे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 04:51 AM2017-10-19T04:51:19+5:302017-10-19T04:51:30+5:30

सांगली महापालिकेच्या वतीने मदनभाऊ पाटील स्मृतीदिनानिमित्त आयोजित मदनभाऊ महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत अहमदनगरच्या निर्मिती रंगमंचच्या ‘खटारा’ या एकांकिकेने एक लाख रुपये व मदनभाऊ महाकरंडक, प्रशस्तीपत्र असे प्रथम

 Madanbhau Mahakrandak Nagar's Khataara | मदनभाऊ महाकरंडक नगरच्या ‘खटारा’कडे  

मदनभाऊ महाकरंडक नगरच्या ‘खटारा’कडे  

Next

सांगली : सांगली महापालिकेच्या वतीने मदनभाऊ पाटील स्मृतीदिनानिमित्त आयोजित मदनभाऊ महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत अहमदनगरच्या निर्मिती रंगमंचच्या ‘खटारा’ या एकांकिकेने एक लाख रुपये व मदनभाऊ महाकरंडक, प्रशस्तीपत्र असे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. द्वितीय क्रमांकाचे ५० हजाराचे बक्षीस मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजच्या ‘निर्वासित’ या एकांकिकेने मिळविले, तर तृतीय क्रमांकावरील कल्याण येथील अभिनय संस्थेच्या ‘दर्दपोरा’ या एकांकिकेने २५ हजाराचे बक्षीस मिळविले.
उत्तेजनार्थ १० हजाराची बक्षिसे औरंगाबादच्या नाट्यवाडा या संस्थेच्या ‘मॅट्रीक’ आणि औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘माणसं’ या एकांकिकेने मिळविला.
महापालिकेच्यावतीने भावे नाट्यमंदिरात गेल्या तीन दिवसांपासून मदनभाऊ महाकरंडक एकांकिका स्पर्धा सुरू होत्या. यात महाराष्टÑातून ३० एकांकिका सादर करण्यात आल्या. काँग्रेसच्या
नेत्या जयश्रीताई पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील,
स्थायी समितीचे सभापती
बसवेश्वर सातपुते, माजी सभापती संतोष पाटील, उपायुक्त सुनील
पवार यांच्याहस्ते बक्षीस समारंभ झाला.
स्पर्धेचा निकाल :
वैयक्तिक बक्षिसे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय : (कंसात एकांकिका) : दिग्दर्शन- विनोद गरुड (खटारा), अभिजित झुंझारराव (दर्दपोरा), शवबा गजमल (माणसं). नेपथ्य- शुभम गाडे, प्रमोद कसबे ( खटारा), सानिक (निर्वासित), अभिजित झुंझारराव (दर्दपोरा). प्रकाशयोजना- श्याम चव्हाण (दर्दपोरा), सूरज गडगिळे (आफ्टर द डायरी), चेतन ढवळे (मॅट्रीक). पार्श्वसंगीत- अक्षय धांगड (निर्वासित), चाणक्य तेंडूलकर, चैतन्य शेंभेकर (माझ्या छत्रीचा पाऊस). नाट्यसंहिता- स्वप्नील जाधव (निर्वासित), प्रवीण पाटेकर (मॅट्रीक), चिन्मय देवर (सॉरी परांजपे). पुरुष अभिनय- साई मिरवाडकर (श्यामची आई), जगदीश जाधव (मॅट्रीक), विशाल चव्हाण (कडमिंत्रे). स्त्री अभिनय- सायली बांदेकर (निर्वासित), मृणाल तांबडकर (श्यामची आई), पारुल देशपांडे (तळ्यात-मळ्यात).

Web Title:  Madanbhau Mahakrandak Nagar's Khataara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी