Khasundit Siddhnath Poshri Yatra Starting | खरसुंडीत सिध्दनाथाची पौषी यात्रा सुरू
खरसुंडीत सिध्दनाथाची पौषी यात्रा सुरू


खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिध्दनाथाची पौषी यात्रा सुरू झाली असून, ती खिलार जनावरांसाठी प्रसिध्द आहे. जातीवंत खिलार जनावरे आणि महाराष्टÑ, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून खरेदी-विक्री करण्यासाठी व्यापारी दाखल झाले आहेत.
पौष पौर्णिमेला दोन दिवस शेळ्या-मेंढ्यांची यात्रा भरत असते. त्यानंतर आठ ते दहा दिवस जनावरांची खरेदी-विक्री होत असते. यात्रेसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, देवस्थान, ग्रामपंचायत यांनी वीज, पाणी, जागा यांचे नियोजन केले आहे. जनावरांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. यात्रा तळावर वीज व इतर सुविधा दिल्या असून गुरूवार ते शनिवारपर्यंत यात्रेत गर्दी होणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर आणि गावातील सार्वजनिक नळांना पुरेसे पाणी सोडले जात आहे. आरोग्य विभागाने यात्रेसाठी जादा औषधसाठा, डॉक्टर, कर्मचारी यांचे नियोजन केले आहे, असे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विनायक हात्तेकर यांनी सांगितले. यात्रेसाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला असून, यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस खाते दक्ष असून, नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी आवाहन केले आहे.
एसटीच्या विविध आगारांतून यात्रा स्पेशल जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यात्राकाळात एसटी स्थानकामध्ये यात्रेकरूंसाठी ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळाच्यावतीने झुणका-भाकर केंद्र चालू केले आहे. दहा रुपयांत ही सेवा दिली जाणार असल्याचे बाळासाहेब पाठक यांनी सांगितले. परिसरातील शेतकरी तसेच नजीकच्या सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातून जनावरांची मोठी आवक होत आहे. छोटी-मोठी हॉटेल्स, खानावळी, दुकाने गावात दाखल झाली आहेत. यामुळे गावातील बाजारपेठ फुलून गेली आहे. सिध्दनाथाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक खरसुंडीत दाखल होत आहेत.
सोमवारी प्रदर्शन : विजेत्यास मानचिन्ह
सोमवार, दि. ८ रोजी जनावरांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, विजेत्यास मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. शेतकºयांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामपंचायतीक डून करण्यात आले आहे.
यात्रेकरूंना सुविधा
यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, सरपंच सौ. लता पुजारी, उपसरपंच जितेंद्र पाटील, माजी उपसरपंच अर्जुन सावकार, विजय भांगे, ग्रामपंचायत, देवस्थान, कृषी उत्पन्न बाजार समिती संंयुुक्तपणे प्रयत्न करीत असून, यात्रेकरूंसाठी यात्रेच्या ठिकाणी जागा वाटप, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा दिली जात आहे.


Web Title: Khasundit Siddhnath Poshri Yatra Starting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.