सांगली जिल्ह्यात १ जानेवारीपासून दळपाच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 06:55 PM2020-12-30T18:55:32+5:302020-12-30T18:59:12+5:30

Consumer Goods -सांगली शहर आणि जिल्ह्यात १ जानेवारीपासून दळपाची दरवाढ करण्यात येणार आहे. विजेचे वाढलेले दर आणि वाढती महागाई यामुळे दरवाढ करणे भाग पडत असल्याची माहिती सांगली शहर गिरणी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश क्षीरसागर यांनी दिली.

Increase in crushing rate in Sangli district from 1st January | सांगली जिल्ह्यात १ जानेवारीपासून दळपाच्या दरात वाढ

सांगली जिल्ह्यात १ जानेवारीपासून दळपाच्या दरात वाढ

Next
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात १ जानेवारीपासून दळपाच्या दरात वाढघरगुती आटा चक्कीमुळे फटका

सांगली : सांगली शहर आणि जिल्ह्यात १ जानेवारीपासून दळपाची दरवाढ करण्यात येणार आहे. विजेचे वाढलेले दर आणि वाढती महागाई यामुळे दरवाढ करणे भाग पडत असल्याची माहिती सांगली शहर गिरणी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश क्षीरसागर यांनी दिली.

ते म्हणाले की, पाच-सहा वर्षांत दळपाच्या दरात अजिबात दरवाढ केली नव्हती. पण गेल्या दोन-तीन वर्षांत विजेचे दर सातत्याने वाढत आहेत. त्याशिवाय महापालिकेचे कर, गिरणीचे सुटे भाग यांची सातत्याने दरवाढ सुरु आहे. तिला तोंड देण्यासाठी दळपाच्या दरवाढीशिवाय पर्याय नाही. तसा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी प्रकाश क्षीरसागर, माणिकराव काटकर, संदीप होनवाडे आदी उपस्थित होते.यावेळी प्रकाश क्षीरसागर, माणिकराव काटकर, संदीप होनवाडे आदी उपस्थित होते.

नवे दर असे असतील

१ जानेवारीपासून नवे दर असे असतील : गहू, ज्वारी प्रतिकिलो सहा रुपये. तांदूळ, बाजरी, नाचणी, डाळ, भाजणी, इडली, ढोकळा, रवा प्रतिकिलो आठ रुपये. मका, मेतकूट, साबुदाणा प्रतिकिलो १० रुपये.


घरगुती आटा चक्कीमुळे फटका

लॉकडाऊन काळात दळणाचे काम घरीच करण्याकडे कल वाढला. घरोघरी छोटी आटा चक्की आली. घरचे दळप घरातच दळण्याची पद्धत सुरु झाली, शिवाय शेजार्यांचेही दळण दळून देण्यास सुरुवात केली. विनापरवाना व्यावसायिक गिरण्या सुरु झल्याचा फटका गिरण व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे ग्राहकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.

 

Web Title: Increase in crushing rate in Sangli district from 1st January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.