पत्नीने साथीदाराच्या मदतीने केला पतीचा खून : शिरसी प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 08:28 PM2017-11-22T20:28:39+5:302017-11-22T20:32:44+5:30

सांगली : शिरसी (ता. शिराळा) येथे अमावास्येच्या रात्री झालेल्या किसन उर्फ कृष्णात तुकाराम शिंदे (४२, रा. कुंडल, ता. पलूस) यांच्या खुनाचा उलगडा करण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे.

Husband's wife killed with wife's help | पत्नीने साथीदाराच्या मदतीने केला पतीचा खून : शिरसी प्रकरण

पत्नीने साथीदाराच्या मदतीने केला पतीचा खून : शिरसी प्रकरण

Next
ठळक मुद्देखुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश, या मंदिरात पशूंचा बळी देण्याची प्रथा नाहीअखेर चार दिवसानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश

सांगली : शिरसी (ता. शिराळा) येथे अमावास्येच्या रात्री झालेल्या किसन उर्फ कृष्णात तुकाराम शिंदे (४२, रा. कुंडल, ता. पलूस) यांच्या खुनाचा उलगडा करण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. त्यांच्या पत्नीने साथीदाराच्या मदतीने पूर्वनियोजित कट रचून हा खून केला असून, प्राथमिक तपासात कौटुंबिक हिंसाचारातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे, असे जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

याप्रकरणी कृष्णात यांची पत्नी उज्ज्वला शिंदे (वय २७) हिला पोलिसांनी अटक केली आहे, तर तिच्या साथीदाराचे नाव निष्पन्न झाले असून, त्यालाही लवकरच ताब्यात घेतले जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले. शिरसीतील चक्र भैरवनाथ मंदिराच्या गाभाºयात शुक्रवारी मध्यरात्री अमावास्येला कृष्णात शिंदे यांचा खून करण्यात आला होता. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. मृतदेहाजवळ हळद-कुंकू, टाचण्या व पूजेचे साहित्य पडले होते. यावरून हा नरबळी असावा, असा संशय होता. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर चार दिवसानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवित त्यांच्या कुटुंबापासून चौकशीला सुरुवात केली. कृष्णात यांच्या पत्नी उज्ज्वला हिच्याकडे चौकशी केली असता तीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तिच्यावर संशय बळावला. तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने खूनाची कबुली दिली.

याबाबत जिल्हा पोलिसप्रमुख शिंदे म्हणाले की, मृतदेहाची ओळख पटविणे व खुनाच्या कारणांचा शोध घेणे मोठे आव्हान होते; इस्लमापूरचे पोलिस उपअधीक्षक किशोर काळे, एलसीबी व गुंडाविरोधी पथकातील पोलिसांनी योग्य दिशेने तपास करून खुनाचा उलगडा केला आहे. कृष्णात पत्नी उज्ज्वलाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून दोघांत सतत भांडण होत असे. गणेशोत्सवापासून ती माहेरी भिलवडी (ता. पलूस) येथे रहात होती. ‘या छळातून मला कायमची मुक्ती दे, त्यासाठी काहीही कर’, असे साकडे तिने साथीदाराला घातले. खुनापूर्वी महिनाभर त्या दोघांची तयारी सुरू होती.

१६ नोव्हेंबर रोजी उज्ज्वला व तिच्या साथीदारात चर्चा झाली. दुसºयादिवशी १७ रोजी दुपारी कृष्णात याला अंकलखोप येथे बोलावून घेण्यात आले. आपल्यात वारंवार भांडणे होतात, ती थांबविण्यासाठी देवाला साकडे घालण्यासाठी ओळखीच्या साथीदारासोबत जा, असे उज्ज्वलाने कृष्णातला सांगितले. त्यानंतर कृष्णात व तो साथीदार मोटारसायकलीवरून शिरसीत आले. तेथे साथीदाराने मध्यरात्रीच्या सुमारास चक्रभैरव मंदिरात त्याच्या डोक्यात दगड, वीट घालून त्याचा खून केला. खुनानंतर त्याने उज्ज्वलाला दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली, असे तपासात निष्पन्न झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.
या खुनाचा उलगडा एलसीबीचे निरीक्षक राजन माने, उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, अशोक डगळे, उदय साळुंखे, हवालदार अमित परिट, संदीप पाटील, सचिन कनप, स्नेहल शिंदे, माणिक केरीपाळे यांच्या पथकाने केला.

नरबळीचा प्रकार नाही : दत्तात्रय शिंदे
अमावास्येच्या रात्री मंदिरात अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. मृतदेहाशेजारी लिंबू, कुंकू व इतर साहित्य सापडले असल्याने, नरबळीचा संशय व्यक्त होत होता. पोलिसांनी तशी शक्यता गृहित धरून तपास केला. शिरसीतील ग्रामस्थांशीही चर्चा केली. मंदिराचे बांधकाम केलेल्या दत्ता माळी यांच्याशीही चर्चा झाली. चक्रभैरव मंदिरातील भैरवनाथ हा महादेवाचा अवतार असल्याचे गावकरी मानतात. मंदिरात गोड नैवेद्य असतो. श्रावण महिन्यात भैरवनाथाची पालखीही निघते. आजुबाजूच्या आठ ते दहा गावांतील लोक दर्शनासाठी येतात. या मंदिरात पशूंचा बळी देण्याची प्रथा नाही. त्यामुळे हा प्रकार नरबळीचा नसल्याचे स्पष्ट झाले होते. आता खुनाचा उलगडाही झाला असून, हा खून कौटुंबिक हिंसाचारातून झाल्याचे उघड झाले आहे, असे जिल्हा पोलिसप्रमुख शिंदे यांनी स्पष्ट केले.

बस तिकिटामुळे ओळख पटली
मृत कृष्णात यांच्या खिशात पाचवा मैल ते अंकलखोपपर्यंतचे एसटी बसचे तिकीट सापडले होते. या तिकिटावरून मृत व्यक्ती पाचवा मैल, पलूस परिसरातील असावी, अशी शक्यता गृहित धरून तपास सुरू केला. अखेर मृत व्यक्ती कुंडल येथील असल्याचे उघड होऊन त्याची ओळख पटली.

पथकाला बक्षीस
शिरसी येथील मंदिरात झालेल्या खुनाची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी, माहिती देणाºयास २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पण पोलिस उपअधीक्षक किशोर काळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या खुनाचा उलगडा केल्याने, हे बक्षीस आता पोलिस पथकाला दिले जाईल, असेही शिंदे यांनी जाहीर केले.

 

Web Title: Husband's wife killed with wife's help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.