येळावीत हजार एकर द्राक्षबागांना फटका गारपिटीचा तडाखा : तासगाव शहरातही गारांसह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:08 AM2018-05-17T00:08:04+5:302018-05-17T00:08:04+5:30

मंगळवारी रात्री येळावी (ता. तासगाव) येथे गारपिटीचा मोठा तडाखा बसला. या गारपिटीचा येळावीसह परिसरातील सुमारे एक हजार एकर द्राक्षबागांना फटका बसला आहे.

Hundreds of thousands of acres of grapefruit hit by hailstorm: Tasgaon city receives rainfall with hail | येळावीत हजार एकर द्राक्षबागांना फटका गारपिटीचा तडाखा : तासगाव शहरातही गारांसह पाऊस

येळावीत हजार एकर द्राक्षबागांना फटका गारपिटीचा तडाखा : तासगाव शहरातही गारांसह पाऊस

Next

तासगाव/येळावी : मंगळवारी रात्री येळावी (ता. तासगाव) येथे गारपिटीचा मोठा तडाखा बसला. या गारपिटीचा येळावीसह परिसरातील सुमारे एक हजार एकर द्राक्षबागांना फटका बसला आहे. खरड छाटणी केलेल्या बागांची पाने फाटली आहेत. अनेक ठिकाणी काड्या मोडल्या आहेत. त्यामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी उसालाही गारपिटीचा फटका बसला आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी तासगाव शहरातही गारपिटीसह पाऊस पडला.

मंगळवारी रात्री येळावी आणि परिसरात सुमारे पाऊण तास वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. या गारपिटीचा मोठा तडाखा द्राक्षबागायतदारांना बसला आहे. येळावीत सुमारे एक हजार एकर द्राक्षबागेचे क्षेत्र आहे. गारपीट झालेल्या भागातील बहुतांश द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे एक हजार एकर द्राक्षबागेला गारपिटीचा तडाखा बसला आहे.

गारपिटीमुळे खरड छाटणीनंतर नव्याने आलेले फुटवे तुटले आहेत. अनेक ठिकाणी काड्या मोडल्या आहेत, तर काही ठिकाणी बागेची पाने फाटल्याचे चित्र आहे. गारपिटीच्या तडाख्यामुळे द्राक्षबागायतदार संकटात सापडले आहेत. त्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. बहुतांश द्राक्षबागायतदारांना फेर खरड छाटणी करावी लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

गारपिटीच्या तडाख्याने उसालाही फटका बसला असून अनेक ठिकाणी उसाचा पाला निघून पडला आहे. द्राक्षबागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, संचालक हणमंतराव चव्हाण, मारुतीराव चव्हाण, मंडल कृषी अधिकारी आर. आर. खरमाटे, कृषी सहाय्यक सी. के. पाटील यांच्यासह अधिकाºयांनी गुरुवारी नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी केली.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तासगाव शहरात जोरदार पावसासह गारपीटीचा तडाखा बसला. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील व्यापारी, वाहनधारकांची तारांबळ उडाल्याचे चित्र होते.

वादळी वाºयासह झोडपले
मंगळवारी येळावीसह परिसरात वादळी वाºयासह पावसाला व गारपिटीस सुरुवात झाली. बांबवडे, निमणी, जुळेवाडी, धनगाव, आमणापूर, सांडगेवाडी गावांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सलग दोन तास सुटलेल्या वादळी वाºयामुळे येळावी येथील उच्च आणि लघुदाबाचे महावितरणचे १३ खांब उखडून पडले. यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. अखंड येळावी गावाला रात्र अंधारात काढावी लागली. बुधवारी दिवसभर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी येळावीत तळ ठोकून खांब उभे करण्याचे काम करीत होते. वादळी वाºयाचा तडाखा पत्र्याच्या आणि कौलारू घरांनाही बसला. येळावी येथील आठ ते दहा घरांवरील पत्र्याचे छत उडून गेले.

घरांचे पत्रे उडाले
दहा ते बारा घरांच्या छताचे पत्रे उडून गेले. महावितरणचे खांब उखडून पडल्याने रात्रभर येळावीतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.
 

येळावीतील सुमारे एक हजार एकरपेक्षा जास्त द्राक्षबागांचे गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. खरड छाटणीचा हंगाम वाया गेल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी.
- प्रकाश पाटील,
ग्रामपंचायत सदस्य, येळावी.

Web Title: Hundreds of thousands of acres of grapefruit hit by hailstorm: Tasgaon city receives rainfall with hail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.