सर्व निवडणुकांत हौसाताई पाटील यांचे मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:42 PM2019-04-23T23:42:26+5:302019-04-23T23:42:30+5:30

सांगली : हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील (वय ९४) यांनीही मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. क्रांतिसिंह नाना पाटील ...

 Hautatai Patil's poll in all the elections | सर्व निवडणुकांत हौसाताई पाटील यांचे मतदान

सर्व निवडणुकांत हौसाताई पाटील यांचे मतदान

Next

सांगली : हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील (वय ९४) यांनीही मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या असलेल्या हौसाताई यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीपासून आजअखेर सर्व निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे.
हौसाताई पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. देश स्वतंत्र झाल्यानंतरही नाना पाटील यांच्याबरोबरीने त्या समाजकार्यात कार्यरत राहिल्या. सामाजिक भान असलेल्या हौसाताई यांनी १९५२ मध्ये झालेल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीपासून ते आजच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वच निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. सध्या हौसाताई यांचे वय ९४ वर्षे आहे. या वयातही जबाबदार मतदार व नागरिक म्हणून त्यांनी हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे मतदानाचा हक्क बजावला.

Web Title:  Hautatai Patil's poll in all the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.