सावर्डेत रोटरमध्ये सापडून बालिका ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:26 PM2018-07-04T23:26:25+5:302018-07-04T23:26:38+5:30

The girl gets caught in a rotor in a rotor | सावर्डेत रोटरमध्ये सापडून बालिका ठार

सावर्डेत रोटरमध्ये सापडून बालिका ठार

Next


तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथील श्रद्धा कुंडलिक पाटील (वय ८ वर्षे) या बालिकेचा ट्रॅक्टरमधून हात सुटून खाली पडल्याने रोटरमध्ये सापडून मृत्यू झाला. छिन्नविच्छिन्न अवस्थेतील तिचा मृतदेह पाहून कुटुंबीयांना शोक अनावर झाला होता. हा प्रकार बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडला. याप्रकरणी तासगाव पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.
श्रद्धाचे मूळ गाव वायफळे आहे. मात्र आई व आपल्या सात वर्षाच्या लहान भावासोबत ती मामाच्या गावी सावर्डे येथे राहते. ती दुसरीत शिकते. तालुक्यातील कौलगे येथील दिलीप मंडले यांच्याशी या कुटुंबीयांची ओळख होती. मंडले यांचा ट्रॅक्टर आहे. बुधवारी ते सावर्डे येथील यल्लमा मंदिराजवळ एका शेतात रोटर मारण्यासाठी निघाले होते. श्रद्धाचे घर या रस्त्यालगतच आहे. यावेळी दिलीप यांनी त्यांच्या घरासमोर ट्रॅक्टर थांबवला. यावेळी श्रद्धाने आपल्या लहान भावासह ट्रॅक्टरमध्ये बसवण्याचा हट्ट धरला. दोघेही ट्रॅक्टरमध्ये चालकाच्या दोन्ही बाजूला धरून बसले. एका शेतात रोटरचे काम संपले. यानंतर दिलीप यांनी दुसऱ्या शेतात काम सुरू केले. यावेळी अचानक श्रद्धाचा ट्रॅक्टरला पकडलेला हात निसटला व ती खाली पडली.
रोटर चालू असल्याने ट्रॅक्टरला गती होती. काही कळण्यापूर्वीच ती रोटरमध्ये सापडली. रोटर फिरल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी हृदय हेलावून टाकणारे दृश्य होते. घटनेची माहिती मिळताच आईसह तिच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. तिचा छिन्नविच्छिन्न मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. रात्री उशिरा याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली.

Web Title: The girl gets caught in a rotor in a rotor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली