३ हजार ६०६ जागांसाठी चालक-वाहकांची भरती, सांगली जिल्ह्यात सर्वांत जास्त जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 06:41 PM2019-02-06T18:41:04+5:302019-02-06T18:45:02+5:30

दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील मेगाभरती काढल्यानंतर एसटी महामंडळाने उर्वरित नऊ जिल्ह्यांसाठी ३,६०६ चालक तथा वाहक पदांसाठी जाहिरात काढली आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांंसाठी १ हजार ६५८ जागांसाठी ही भरती होणार आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यात सर्वांत जास्त जागा आहेत.

Driver recruitment for 3 thousand 606 seats, maximum number of seats in Sangli district | ३ हजार ६०६ जागांसाठी चालक-वाहकांची भरती, सांगली जिल्ह्यात सर्वांत जास्त जागा

३ हजार ६०६ जागांसाठी चालक-वाहकांची भरती, सांगली जिल्ह्यात सर्वांत जास्त जागा

Next
ठळक मुद्दे३ हजार ६०६ जागांसाठी चालक-वाहकांची भरती, सांगली जिल्ह्यात सर्वांत जास्त जागानऊ जिल्ह्यांसाठी भरती

कोल्हापूर : दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील मेगाभरती काढल्यानंतर एसटी महामंडळाने उर्वरित नऊ जिल्ह्यांसाठी ३,६०६ चालक तथा वाहक पदांसाठी जाहिरात काढली आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांंसाठी १ हजार ६५८ जागांसाठी ही भरती होणार आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यात सर्वांत जास्त जागा आहेत.

एसटी महामंडळाकडून चालक तथा वाहकांची भरती केली जाणार आहे. या पदांवरील कर्मचाऱ्यांनी दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाने खर्चावर नियंत्रण आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार येत्या काही वर्षांत, काही एसटी बसवर वाहक न नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच महामंडळाकडून वाहकाची जबाबदारीही चालकावरच दिली जाणार आहे.

एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर  बुधवारपासून ही माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे; त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मिळून तब्बल ८०२२ चालक तथा वाहक पदांची भरती करण्यासाठीची जाहिरात एसटी महामंडळाकडून प्रसारित करण्यात आली आहे. अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व वर्धा अशा नऊ जिल्ह्यांमध्ये ही भरती होणार आहे. 

एकाच ठिकाणी परीक्षा देता येणार

दुष्काळग्रस्त १२ जिल्हे व सध्या जाहिरात प्रसिद्ध झालेल्या नऊ जिल्ह्यांतील उमेदवारांची परीक्षा एकाच दिवशी होणार आहे; त्यामुळे एका उमेदवाराला केवळ एकाच ठिकाणी परीक्षा देता येणार आहे.

कागदपत्रे...

चालक तथा वाहक पदांसाठी अवजड वाहन परवाना, इयत्ता १0 वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव आणि चालक-वाहकसाठी आवश्यक असणाऱ्या परिवहन विभागाचा अधिकृत बिल्ला असणे आवश्यक आहे.

अशा आहेत रिक्त जागा
जिल्हा           एकूण जागा
सांगली             ७६१
सातारा            ५१४
कोल्हापूर         ३८३
 

 

Web Title: Driver recruitment for 3 thousand 606 seats, maximum number of seats in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.