दुष्काळात डाळींच्या दरवाढीचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 07:28 PM2019-05-19T19:28:06+5:302019-05-19T19:28:10+5:30

अशोक डोंबाळे । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मागणीत सातत्याने होत असलेली वाढ आणि दुष्काळी परिस्थितीत घटलेले उत्पादन यामुळे ...

Dough boom in drought | दुष्काळात डाळींच्या दरवाढीचा दणका

दुष्काळात डाळींच्या दरवाढीचा दणका

googlenewsNext

अशोक डोंबाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मागणीत सातत्याने होत असलेली वाढ आणि दुष्काळी परिस्थितीत घटलेले उत्पादन यामुळे डाळींच्या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसला आहे. दीड महिन्यातच क्विंटलमागे सरासरी दीड ते दोन हजार रुपयांची वाढ झाली असून, या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना न होता व्यापाऱ्यांनाच होताना दिसत आहे. तूर, मूग आणि हरभरा डाळ यांच्या दराचा आलेख ऐन दुष्काळातच वाढत चालला आहे.
महागाई दिवसेंदिवस वाढत असताना, आता पुन्हा डाळींच्या दराने त्यात मोठी भर टाकली आहे. त्यामुळे किचनचे बजेट कोलमडणार असल्याचे चित्र आहे. तुरीचे पीक फेब्रुवारीच्या दुसºया आठवड्यात आले. तूरडाळ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारात मुबलक प्रमाणात विक्रीस आली, तेव्हा ठोक बाजारात प्रतिकिलो ५० ते ६० रुपये भावाने विक्री झाली. दीड महिन्यातच प्रतिकिलोचे भाव ८० ते ९० रुपयांवर पोहोचले आहेत. कमी पावसामुळे यावर्षी तुरीसह सर्वच कडधान्यांचे पीक कमी येण्याचा कृषी तज्ज्ञांचा अंदाज होता. सर्व बाबी हेरून व्यापाºयांनी डाळींचे भाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तूरडाळ पुन्हा शंभर रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सांगलीसह लातूर, बीड परिसरातून येथील मार्केटमध्ये डाळींची आवक मोठ्या प्रमाणावर होत असते.
तीन वर्षांपूर्वी तूरडाळीचे भाव प्रतिकिलो १७० रुपयांपर्यंत पोहोचले होते. वाढीव भावामुळे दुष्काळामध्ये सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. दोन वर्षापूर्वी तुरीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे डाळींचे दर उतरले होते.
यावर्षी पुन्हा पीक कमी झाले आहे. वाढत्या मागणीमुळे भाव पुन्हा वाढले आहेत. बाजारात मुगाचे भाव वाढू लागले आहेत. सध्या मूगडाळीचा दर ७५०० ते ८००० रुपये क्विंटलवर पोहोचला आहे. किरकोळ मूगडाळीची विक्री ८० ते ८२ रुपये प्रतिकिलो दराने होत आहे. हरभºयाचे उत्पादन कमी झाल्याने त्याचेही भाव वाढत आहेत.
हरभरा भाव ३८०० ते ४००० रुपये क्विंटल असा आहे. हरभरा डाळीचा दर ५७०० ते ६५०० रुपये क्विंटल असून, त्यामध्ये तीनशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली.
हरभरा डाळीची किरकोळ विक्री ५५ ते ७० रुपये किलोने होत आहे. तूरडाळ ८००० ते ९००० रुपये क्विंटल झाली असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.

डाळींचे दर (प्रतिकिलो)
डाळ एप्रिल २०१९ मे २०१९
तूर ७० ते ७४ ८० ते ९०
हरभरा ५० ते ५२ ५७ ते ६५
मूग ६५ ते ७० ७५ ते ८०
मटकी ७२ ते ७५ ८० ते ८५
मसूर ५० ते ५२ ५४ ते ५५
उडीद ५२ ते ५४ ६० ते ६५

Web Title: Dough boom in drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.