जिल्हा बँकेचे नुकसान, सुनावणी लांबणीवर

By admin | Published: February 13, 2015 10:32 PM2015-02-13T22:32:30+5:302015-02-13T22:55:37+5:30

संस्थांचे कर्ज वाटप : १०२ जणांना नोटीस

District Bank Damage, Prolong the Hearing | जिल्हा बँकेचे नुकसान, सुनावणी लांबणीवर

जिल्हा बँकेचे नुकसान, सुनावणी लांबणीवर

Next

सांगली : जिल्हा बँकेला १५७ कोटींचे नुकसान केल्याप्रकरणी मुदतवाढ मागितल्याने या प्रकरणाची सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. याबाबतची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती आज (शुक्रवार) प्रशासकांकडून देण्यात आली.
नियमबाह्य, विनातारण व मर्यादा ओलांडून २१ संस्थांना कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी माजी संचालक व अधिकाऱ्यांसह १०२ जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. चौकशी अधिकारी म्हणून कऱ्हाडचे उपनिबंधक संपतराव गुंजाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रकरणी सहकारमंत्र्यांनी अपील फेटाळल्याने ही चौकशी सुरू आहे.
आज माजी संचालक मदन पाटील, दिलीप वग्याणी, डॉ. सिकंदर जमादार यांच्यासह नऊ जणांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ मागितली. ती मान्य करून आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता पुढील सुनावणीची तारीख सोयीने जाहीर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: District Bank Damage, Prolong the Hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.