महावितरण कंपनीकडे वीज मीटरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 03:38 PM2019-04-18T15:38:07+5:302019-04-18T15:40:27+5:30

सांगली : वीज मीटरचा तुटवडा संपुष्टात आल्याचे महावितरणचे अधिकारी सांगत असले तरी, जिल्ह्यात आजही पाच ते सहा हजार वीज ...

Dismantling of electricity meter by MSEDCL | महावितरण कंपनीकडे वीज मीटरचा तुटवडा

महावितरण कंपनीकडे वीज मीटरचा तुटवडा

googlenewsNext
ठळक मुद्देभविष्यात वीज मीटरची टंचाई भासणार नाही.

सांगली : वीज मीटरचा तुटवडा संपुष्टात आल्याचे महावितरणचे अधिकारी सांगत असले तरी, जिल्ह्यात आजही पाच ते सहा हजार वीज मीटर्सचा तुटवडाच आहे. पन्नास हजार जुनी मीटर्स महिन्याला बदलण्याचे उद्दिष्ट असताना, केवळ महिना तीन   ते चार हजार नवीन मीटर्स मिळत आहेत. नवीन कनेक्शन देण्यातही अडचणी येत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

वीज गळती रोखण्यासाठी महावितरण कंपनीने घरगुती, वाणिज्य, शेती आणि औद्योगिक विभागातील जुनी इलेक्ट्रो-मेकॅनिकल मीटर व नादुरुस्त मीटर बदलण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात घरगुती पाच लाख ४८ हजार १२, वाणिज्य ४९ हजार ६९८, शेतीचे दोन लाख २१ हजार ६४४ आणि औद्योगिकचे नऊ हजार ५५२ ग्राहक आहेत. या ग्राहकांपैकी ६० टक्के ग्राहकांकडे   जुनी मीटर आहेत. जुने मीटर बदलल्यामुळे ग्राहक आणि महावितरणच्याही फायद्याचेच आहे. 

वीज मीटर बदलण्याचा आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून मिळतो. पण, तेवढ्या प्रमाणात मीटरच मिळत नसल्यामुळे स्थानिक अधिकाºयांचे हाल होत आहेत. जिल्ह्यात महिन्यासाठी दहा हजार नवीन वीज मीटर्सची गरज असताना, केवळ तीन  ते चार हजारच मीटर्स मिळत आहेत. यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. तसेच मीटरच्या तुटवड्यामुळे अनेकवेळा वीज ग्राहक आणि महावितरण कर्मचारी यांच्यात वादाचे प्रकार घडताना दिसत आहेत. नवीन कनेक्शन देण्यातही अडचणी येत आहेत. नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे.

महावितरणच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, महावितरणने ३० लाख नवीन सिंगल फेज वीज मीटर्सची खरेदी केली असून, पहिल्या टप्प्यात त्यातील ८९ हजार नवीन मीटर्स आॅगस्ट महिन्यात विविध कार्यालयांत उपलब्ध करून दिली आहेत. सप्टेंबर महिन्यात सुमारे २ लाख ६० हजार मीटर्स उपलब्ध झाली आहेत. पुढील प्रत्येक महिन्यात सुमारे ३ लाख ८० हजार नवीन वीज मीटर्स ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. २०१९ च्या मे महिन्यापर्यंत ही ३० लाख मीटर्स महावितरणला मिळणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन केले आहे. भविष्यात वीज मीटरची टंचाई भासणार नाही.

Web Title: Dismantling of electricity meter by MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.