सांगलीतील १७ कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांना ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:52 PM2019-01-13T23:52:19+5:302019-01-13T23:52:24+5:30

सांगली : ‘एफआरपी’चे तुकडे न करता ती एकरकमी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेल्या ...

The departmental offices of 17 factories in Sangli have been stopped | सांगलीतील १७ कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांना ठोकले टाळे

सांगलीतील १७ कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांना ठोकले टाळे

Next

सांगली : ‘एफआरपी’चे तुकडे न करता ती एकरकमी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनाचा, जिल्ह्यात रविवारी दुसºया दिवशीही भडका उडाला. तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस तालुक्यातील १७ साखर कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांचे कामकाज बंद पाडून टाळे ठोकले. दरम्यान, कृष्णा साखर कारखान्याचे रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथील कार्यालय पेटविल्याप्रकरणी तिघांविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी रविवारी कवठेएकंद (ता. तासगाव) येथील दत्त इंडिया (वसंतदादा पाटील कारखाना, सांगली), पारे (ता. खानापूर) येथील उदगिरी शुगर, मोहनराव शिंदे (आरग, ता. मिरज), सोनहिरा (वांगी, ता. कडेगाव) या तीन कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांना टाळे ठोकून दैनंदिन कामकाज बंद पाडले.
पलूस तालुक्यात भिलवडी येथे हुतात्मा (वाळवा), क्रांती (कुंडल, ता. पलूस), सोनहिरा, उदगिरी शुगर, दत्त इंडिया या पाच कारखान्यांच्या कार्यालयांना टाळे ठोकले, तर अंकलखोप येथेही याच चार काखान्यांच्या विभागीय कार्यालयांना टाळे ठोकले. तेथील कर्मचाºयांचे काम बंद पाडले.
कुरुंदवाडमध्ये रास्ता रोको, तुटलेला ऊस जाऊ द्या : राजू शेट्टी
केवळ २३०० रुपये पहिली उचल दिल्याने संतप्त स्वाभिमानी संघटनेने नृसिंहवाडी-कुरुंदवाड रस्त्यावरील शिवतीर्थ येथे रविवारी सकाळी रास्ता रोको केला. एक तासाहून अधिक काळ रास्ता रोको झाला. मात्र, शेतातून तुटलेला ऊस कारखान्यास जाऊ देण्याचे आदेश खासदार राजू शेट्टी यांनी दिल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. ऊस वाहतुकीच्या वाहनाबरोबर सर्वच वाहने अडविल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: The departmental offices of 17 factories in Sangli have been stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.