बलात्काराची केस मागे घेण्यासाठी पाच लाखांच्या खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:43 AM2017-10-31T11:43:29+5:302017-10-31T11:47:54+5:30

ताकारी (ता. वाळवा) येथील महिलेवर आठ महिन्यांपूर्वी झालेल्या बलात्कारासंदर्भातील केस मागे घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या  दलित महासंघाच्या नेत्यासह चौघांविरुध्द खंडणीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. सुनील शामराव लोखंडे (रा. ताकारी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Demand of five lakh rupees for rape | बलात्काराची केस मागे घेण्यासाठी पाच लाखांच्या खंडणीची मागणी

बलात्काराची केस मागे घेण्यासाठी पाच लाखांच्या खंडणीची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देइस्लामपुरात गुन्हा दलित महासंघाच्या नेत्यासह चौघांविरुध्द तक्रारएका संशयिताची रेल्वेखाली आत्महत्या

इस्लामपूर : ताकारी (ता. वाळवा) येथील महिलेवर आठ महिन्यांपूर्वी झालेल्या बलात्कारासंदर्भातील केस मागे घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या  दलित महासंघाच्या नेत्यासह चौघांविरुध्द खंडणीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला.


सुनील शामराव लोखंडे (रा. ताकारी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी दलित महासंघाचा राज्य सरचिटणीस शंकर ज्ञानू महापुरे, रमेश दाविद थोरात, विजय दाविद थोरात यांच्यासह एका महिलेविरूध्द खंडणीचा गुन्हा नोंद केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फेबु्रवारी महिन्यात एका महिलेचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी शुभम लोखंडे, राहुल पारसे, सुमेर मगदूम अशा तिघांविरुध्द पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

बलात्काराच्या गुन्ह्यातून शुभम लोखंडे हा जामिनावर बाहेर आल्यानंतर संबंधित महिलेसह इतर संशयितांनी शुभम याला, बलात्काराची केस मिटवून घेतो, यासाठी ५ लाख रुपये दे, अशी मागणी करीत, ही रक्कम न दिल्यास दुसरी केस दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे सुनील लोखंडे यांनी पोलिसात धाव घेतली.

एका संशयिताची रेल्वेखाली आत्महत्या

गुन्हा दाखल झाला त्याचदिवशी यातील सुमेर मगदूम याने भिलवडी परिसरात रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेनंतर संबंधित महिलेसह इतरांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा भिलवडी पोलिसांत नोंद आहे. या प्रकरणात शुभम लोखंडे हा साक्षीदार आहे.

Web Title: Demand of five lakh rupees for rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.