काँग्रेसचे दोन पं. स. सदस्य भाजप नेत्यांच्या संपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:25 PM2019-07-01T23:25:57+5:302019-07-01T23:26:22+5:30

मिरज पंचायत समितीतील काँग्रेसचे दोन सदस्य भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या गोटातून केला जात आहे. त्यामुळे विरोधी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपच्या संपर्कात असलेले ते दोन सदस्य कोण

Congress two Pt. C. Members are in touch with BJP leaders | काँग्रेसचे दोन पं. स. सदस्य भाजप नेत्यांच्या संपर्कात

काँग्रेसचे दोन पं. स. सदस्य भाजप नेत्यांच्या संपर्कात

Next
ठळक मुद्देमिरज पंचायत समिती : तालुक्यात खळबळ; उलटसुलट चर्चा

मिरज : मिरज पंचायत समितीतील काँग्रेसचे दोन सदस्य भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या गोटातून केला जात आहे. त्यामुळे विरोधी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपच्या संपर्कात असलेले ते दोन सदस्य कोण, याची चर्चा पंचायत समितीत सुरू आहे.
मिरज पंचायत समितीत पन्नास वर्षांहून अधिक काळ काँग्रेसची सत्ता होती. गत निवडणुकीत दोन अपक्षांच्या पाठबळावर व बारा सदस्यांच्या बहुमतावर काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवत पंचायत समितीत आ. सुरेश खाडे व आ. सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नाने भाजपची सत्ता आली. सध्या सत्ताधारी भाजपचे बारा व विरोधी काँग्रेस, राष्टÑवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे दहा अशी सदस्यसंख्या आहे.

सत्तांतरानंतर पंचायत समितीत सातत्याने सत्तासंघर्ष दिसून येतो. सत्ताधारी भाजपमधील मतभेद व संघर्षाची संधी साधण्याचा प्रयत्न विरोधी काँग्रेस व राष्टÑवादी करीत आहे.
उपसभापती निवडीत भाजप नेत्यांनी डावलल्याने बुधगावचे सदस्य विक्रम पाटील यांनी बंड केले. या बंडखोरीला दोन्ही काँग्रेसने बळ देऊन पाटील यांना उपसभापतीपदी बसविले. भाजपने मिरज मतदारसंघाला आ. सुरेश खाडे यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्रीपद दिल्याने मतदार संघातील राजकारणाची हवाच बदलली आहे. याचा प्रभाव विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर होताना दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगलीत चिन्ह बदलून निवडणूक लढवावी लागली. निवडणुकीतील अपयशाला सामोरे जावे लागले. प्रबळ नेतृत्वाचा अभाव व सत्तास्थान नसल्याने विकास साधायचा कसा, या विवंचनेने काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी लोकसभा निवडणूक कालावधित भाजपमध्ये प्रवेश केला. नेत्यांच्या प्रवेशाने स्थानिक पातळीवरील त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला नसला तरी, ते भाजपच्या मार्गावरून वाटचाल करीत आहेत. त्याला पंचायत समितीचे सदस्यही अपवाद नाहीत. सध्या मिरज पंचायत समितीतील काँग्रेसचे दोन सदस्य पक्षप्रवेशासाठी भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात असल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे. भाजपच्या संपर्कात असणारे हे दोन सदस्य कोण, याचीच चर्चा सध्या मिरज पंचायत समितीत सुरू आहे.

सदस्य संपर्कात असल्याचा दावा
लोकसभा निवडणुकीत खा. संजयकाका पाटील यांचा मताधिक्याने झालेला विजय, आ. सुरेश खाडे यांना मिळालेले कॅबिनेट मंत्रीपद यामुळे मतदार संघात भाजपचा प्रभाव वाढला आहे. विरोधी पक्षातील अनेक नेतेमंडळी भाजप प्रवेशासाठी इच्छुक आहेत. स्थानिक गटाचे नेते भाजपच्या संपर्कात असल्याने, त्यांच्याच गटाचे पंचायत समितीचे दोन सदस्यही पक्षप्रवेशासाठी भाजपच्या संपर्कात आहेत. याबाबत त्या दोन सदस्यांसोबत व त्यांच्या नेत्यांसोबत चर्चाही झाल्याचा दावा केला जात आहे.

Web Title: Congress two Pt. C. Members are in touch with BJP leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.