कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामभाऊ उगळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:01 AM2017-08-22T00:01:30+5:302017-08-22T00:01:30+5:30

Congress leader Rambhau Uggle passes away | कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामभाऊ उगळे यांचे निधन

कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामभाऊ उगळे यांचे निधन

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : आमणापूर (ता. पलूस) येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. रामचंद्र पांडुरंग तथा रामभाऊ उगळे (वय ७१) यांचे सोमवारी पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पलता, मुलगा उत्कर्ष, मुलगी अर्चना असा परिवार आहे.
प्रा. उगळे यांचा जन्म १५ आॅक्टोबर १९४६ रोजी झाला. ते १९७९-९० अशी सलग ११ वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. तासगाव पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. तासगाव साखर कारखान्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. महाराष्ट्र राज्य लेखा समितीचे अध्यक्ष, बालभारतीचे संचालक, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस, डॉ. पतंगराव कदम खरेदी-विक्री संघाचे संस्थापक संचालक, भारती विद्यापीठाच्या सांगली विभागाचे संघटक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे सदस्य अशी विविध पदे त्यांनी भूषविली. आमणापूर परिसरात स्वामी रामानंद भारती शिक्षण प्रसारक संस्थेचे घोगाव हायस्कूल, विठ्ठल विविध कार्यकारी सोसायटी, किसान पेट्रोल पंप, श्रीराम पाणीपुरवठा संस्था, श्रीराम पतसंस्था, श्री रामभाऊ उगळे स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी, श्रीराम बझार, स्फूर्ती वाचनालय, श्रीराम कृषी मंडळ, बसवेश्वर पतसंस्था अशा विविध संस्थांची उभारणी प्रा. उगळे यांनी केली.
प्रा. उगळे १९६८ पासून काँग्रेसचे क्रियाशील कार्यकर्ते होते. डॉ. पतंगराव कदम यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जात. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी आदर्श कामकाजाचा विशेष ठसा उमटविला होता.
यावेळी भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम म्हणाले की, रामभाऊ उगळे यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. विकासाच्या त्यांच्या अपुºया संकल्पना आपण पूर्ण करू.
आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले की, रामभाऊ उगळे यांच्यारूपाने अभ्यासू नेत्याला जिल्हा मुकला आहे.
आमणापूर (ता. पलूस) येथील निवासस्थानापासून स्मशानभूमीपर्यंत उगळे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. मुलगा उत्कर्ष यांनी पार्थिवास अग्नी दिला.
यावेळी आमदार मोहनराव कदम, आमदार सुमनताई पाटील, अरुण लाड, महेंद्र लाड, आर. एम. पाटील, जे. के. जाधव, ए. डी. पाटील, बापूसाहेब येसुगडे, खाशाबा दळवी, सुनील पाटील, सुहास पुदाले, आकाराम पाटील, सुनील जाधव, बापूसाहेब शिरगावकर, संतोष पाटील, गंगाराम सूर्यवंशी, सतीश पाटील, पी. जी. पाटील, प्राचार्य सुनील कांबळे, सतीश पाटील उपस्थित होते.
निष्ठेचे आदर्श उदाहरण!
अंत्यविधीप्रसंगी प्रा. उगळे यांना आदरांजली वाहताना माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, १९८० पासून माझ्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून प्रा. राम उगळे माझ्यासोबत होते. कार्यकर्ता कसा असावा, निष्ठा कशी असावी, हे त्यांच्याकडून शिकावे. विकास कामासाठी ते आग्रही असत.

Web Title: Congress leader Rambhau Uggle passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.