युवक राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दुतोंडी सापाचे व्यंगचित्र भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:56 PM2019-02-19T12:56:31+5:302019-02-19T12:58:13+5:30

युवक राष्ट्रवादीने मंगळवारी सकाळी सेनेने भाजपशी युती केल्यामुळे दुतोंडी सापाचे व्यंगचित्र भेट देऊन त्यांच्या राजकीय भूमिकेवर जोरदार टीका केली. युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस यांनी सूरज चव्हाण यांनी व्यंगचित्र तयार करून प्रेमसहीत ते उद्धव ठाकरेंना पाठविल्याचे एका चित्रफीतीत म्हटले आहे. सोशल मिडियावर हे व्यंगचित्र व व्हिडिओ राष्ट्रवादीने व्हायरल केले आहे.

Cartoon cartoon of Danti Dast by Shivsena Youth NCP | युवक राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दुतोंडी सापाचे व्यंगचित्र भेट

युवक राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दुतोंडी सापाचे व्यंगचित्र भेट

Next
ठळक मुद्देसोशल मिडियावरही व्हिडिओ व्हायरलस्वत:च्याच भूमिकेला तिलांजली दिल्याची टीका, शिवसैनिकांबद्दल सहानुभूती व्यक्त

सांगली : युवक राष्ट्रवादीने मंगळवारी सकाळी सेनेने भाजपशी युती केल्यामुळे दुतोंडी सापाचे व्यंगचित्र भेट देऊन त्यांच्या राजकीय भूमिकेवर जोरदार टीका केली. युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस यांनी सूरज चव्हाण यांनी व्यंगचित्र तयार करून प्रेमसहीत ते उद्धव ठाकरेंना पाठविल्याचे एका चित्रफीतीत म्हटले आहे. सोशल मिडियावर हे व्यंगचित्र व व्हिडिओ राष्ट्रवादीने व्हायरल केले आहे.

सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे की, गेली चार वर्षे शिवसेनेने सत्तेत असूनही विरोधाची भूमिका घेतली होती. पुढील निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट करून भाजप नेत्यांवर तसेच राज्यातील कारभारावर त्यांनी जोरदार टीका केली. शिवसैनिकांनाही तशाच सूचना दिल्या होत्या.

युतीच्या माध्यमातून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेऊन त्यांच्याच भूमिकेला तिलांजली दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे जे सच्चे शिवसैनिक आहेत, त्यांच्याबद्दल मला व राष्ट्रवादीला सहानुभूती वाटते. उद्धव ठाकरे यांची ही भूमिका दुतोंडी सापासारखी आहे. त्यामुळे त्यांना शोभेल अशी ही व्यंगचित्राची प्रतिमा आम्ही भेट देत आहोत. त्यांनी खुल्या दिलाने ती स्वीकार करावी, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

Web Title: Cartoon cartoon of Danti Dast by Shivsena Youth NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.