सांगली -  सांगली, मिरजेसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यामुळे एसटी बस सेवा ठप्प आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी तीव्र आंदोलन सुरू आहेत. परिणामी विटा बस स्थानकात शुकशुकाट असून  एसटीच्या लोकल व लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.  
पेठ -शिराळा राज्य महामार्गावर रेठरे धरण येथे युवकांनी टायर पेटवून सुमारे अर्धा तास रास्ता रोको केला.  


 


Web Title: Bhima Koregaon incident: Stopped in Kanchadi in Sangli
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.