निवडणुकीबाबत माहिती एका क्लिकवर सांगलीत प्रशिक्षण : ट्रू व्होटर अ‍ॅपबद्दल इच्छुकांना धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:26 PM2018-05-21T23:26:00+5:302018-05-21T23:26:58+5:30

सांगली : महापालिकेच्या नव्या सभागृहात जाऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांसह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ट्रू व्होटर अ‍ॅपचे प्रशिक्षण दिले.

All information about the elections in Sangli, Training Verges: One Click Lessons for True Voter App | निवडणुकीबाबत माहिती एका क्लिकवर सांगलीत प्रशिक्षण : ट्रू व्होटर अ‍ॅपबद्दल इच्छुकांना धडे

निवडणुकीबाबत माहिती एका क्लिकवर सांगलीत प्रशिक्षण : ट्रू व्होटर अ‍ॅपबद्दल इच्छुकांना धडे

Next

सांगली : महापालिकेच्या नव्या सभागृहात जाऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांसह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ट्रू व्होटर अ‍ॅपचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणास मोठा प्रतिसाद मिळाला.

निवडणूक प्रक्रियेची मतदार, अधिकारी आणि उमेदवार यांना माहिती व्हावी, यासाठी आयोगाने ट्रू व्होटर हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपचे प्रशिक्षण सोमवारी महापालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात झाले. आयोगाचे अप्पर सचिव नि. ज. वागले, उपायुक्त अविनाश सणस, कक्ष अधिकारी अतुल जाधव उपस्थित होते.या अ‍ॅपबाबत आयोगाचे अधिकारी मुरलीधर भुथडा यांनी माहिती दिली. पहिल्या सत्रात महापालिकेचे अधिकारी व कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले, तर दुसºया सत्रात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती दिली गेली.

या अ‍ॅपवर नोंदणी कशी करावी, त्याची कार्यप्रणाली काय आहे, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अ‍ॅपद्वारे मतदार व इच्छुक उमेदवारांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा उमेदवाराला सर्व मतदारांपर्यंत पोहोचता येत नाही. तसेच मतदाराला त्याच्या समस्याही उमेदवारांना सांगता येत नाहीत. ट्रू व्होटर अ‍ॅपद्वारे इच्छुक उमेदवार सर्व मतदारांपर्यंत आपला अजेंडा पोहोचवू शकतो. तसेच मतदार व्हाईस कॉलद्वारे त्याच्या भागातील समस्या उमेदवारांना सांगू शकतो, अशी व्यवस्था केली आहे. एकाच क्लिकवर प्रभागाची मतदार यादी उपलब्ध होणार आहे.

उमेदवाराचा निवडणूक खर्च, आयोगाच्या विविध आदेशापासून ते अगदी निकालापर्यंतची सर्व माहिती या अ‍ॅपवर उपलब्ध असेल, असे भुथडा यांनी सांगितले.यावेळी आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त सुनील पवार व स्मृती पाटील, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, सहाय्यक आयुक्त एस. व्ही. पाटील, जनसंपर्क अधिकारी डी. व्ही. हर्षद उपस्थित होते.

प्ले स्टोअरवर उपलब्ध
राज्य निवडणूक आयोगाचे ट्रू व्होटर हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. तेथून ते डाऊनलोड करता येऊ शकते. डाऊनलोड केल्यानंतर मतदारांना नोंदणी करावी लागेल. त्यानंतर अ‍ॅपवर सर्व माहिती उपलब्ध होईल. हे अ‍ॅप इतर सोशल मीडियाप्रमाणे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असावे, ते कधीच डिलिट केले जाऊ नये, अशी आयोगाची इच्छा आहे. त्यादृष्टीने अ‍ॅप तयार करण्यात आल्याचेही भुथडा म्हणाले.

आचारसंहिता भंगावरही वॉच
निवडणुकीत आचारसंहिता भंग करण्याच्या प्रकारावरही ट्रू व्होटर अ‍ॅपद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. मतदारांना आमिष, पैसे वाटप अशा गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी या अ‍ॅपचा वापर होणार आहे. मतदारांनी या अ‍ॅपवर आचारसंहिता भंगाची तक्रार करावी. ही तक्रार महापालिका अधिकारी व पोलीस अधिकाºयांकडे जाईल. त्यामुळे तातडीने कारवाई करणेही सोयीचे ठरणार असल्याचे आयोगाच्या अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: All information about the elections in Sangli, Training Verges: One Click Lessons for True Voter App

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.