सांगली : वारणा नदीत सापडला वीस किलोचा मासा, मासा अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिड कुळातील कटला वंशाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 03:33 PM2018-01-09T15:33:03+5:302018-01-09T15:35:57+5:30

बागणी (ता. वाळावा) येथील सागर जयवंत आपटे व आकाश जयवंत आपटे यांच्या जाळ्यात तब्बल २० किलोचा कटला जातिचा मासा सापडला. अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिड कुळातील कटला वंशाचा हा मासा कार्प नावाने ओळखल्या जाणार्या मास्यांच्या समुहातील आहे.

20 kg of fish found in the river Varna, fish of the cystic acid of the osteoporosis | सांगली : वारणा नदीत सापडला वीस किलोचा मासा, मासा अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिड कुळातील कटला वंशाचा

सांगली : वारणा नदीत सापडला वीस किलोचा मासा, मासा अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिड कुळातील कटला वंशाचा

googlenewsNext
ठळक मुद्देतब्बल २० किलोचा कटला जातीचा मासा अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिड कुळातील कटला वंशाचा हा मासा कार्प नावाने ओळखतातमासा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची झाली होती गर्दी

बागणी : बागणी (ता. वाळावा) येथील सागर जयवंत आपटे व आकाश जयवंत आपटे यांच्या जाळ्यात तब्बल २० किलोचा कटला जातिचा मासा सापडला.

बागणी येथील भोई समाज वारणा नदीमध्ये परंपरागत मासेमारीचा व्यवसाय करतात. रविवारी सागर व आकाश नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या जाळ्यात तब्बल २० किलोचा कटला जातीचा मासा सापडला.

अस्थिमत्स्यांच्या सायप्रिनिड कुळातील कटला वंशाचा हा मासा कार्प नावाने ओळखल्या जाणाऱ्या मास्यांच्या समुहातील आहे. महाराष्ट्रात  याला तांबर, तर काही ठिकाणी कटला असे म्हणतात.

कटला हा मासा गोड्या पाण्यात आढळतो. मध्यंतरी ही मास्याची जात दुर्मिळ होत चालली होती. परंतु, मत्स संवर्धनामुळे हल्ली बहुतांशी ठिकाणी हे मासे आढळून येत आहेत. कटला मासे पुरा दरम्यान धरणातून नदीत येतात. मासा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती.

Web Title: 20 kg of fish found in the river Varna, fish of the cystic acid of the osteoporosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.