सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 12.43 टी.एम.सी. पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 03:34 PM2019-07-09T15:34:36+5:302019-07-09T15:35:50+5:30

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 12.43 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

12.43 TMC in Warana dam in Sangli district Water storage | सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 12.43 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 12.43 टी.एम.सी. पाणीसाठा

googlenewsNext
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 12.43 टी.एम.सी. पाणीसाठासकाळपर्यंत सरासरी 7.90 मि. मी. पावसाची नोंद

सांगली: जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 12.43 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 31.14 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 3.55 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 3.90 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 6.45 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 4.07 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी. आहे. अलमट्टी धरणात 45.42 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 10.9 (45), आयर्विन पूल सांगली 17 (40) व अंकली पूल हरिपूर 21.4 (45.11).

सकाळपर्यंत सरासरी 7.90 मि. मी. पावसाची नोंद

सांगली जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 7.90 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 36.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे.

मिरज 7, जत 1.5, खानापूर-विटा 4.4, वाळवा-इस्लामपूर 9.5, तासगाव 2.2, शिराळा 36.3, कवठेमहांकाळ 3.4, पलूस 1.8, कडेगाव 6 व आटपाडी - निरंक.

Web Title: 12.43 TMC in Warana dam in Sangli district Water storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.