New study claims that youngest child tends to be parents favorite | आई-वडिलांचं आवडतं असतं लहान मूल - सर्व्हे
आई-वडिलांचं आवडतं असतं लहान मूल - सर्व्हे

(Image Credit : Metro)

जवळपास सर्वच घरांमध्ये आई-वडिलांशी भावंड एकाच गोष्टीवरून भांडत असतात. ती म्हणजे, त्यांचं सर्वात लाडकं कोण? यावर आई-वडिल आमच्यासाठी सर्वच सारखे असं सांगून भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतात, पण ही भांडणं संपण्याचं काही नाव घेत नाही. अनेकदा मोठ्या भावंडांना वाटत असतं की, आई-वडिल लहान भावंडांचे जास्त लाड करतात आणि त्यांच्यावरच जास्त प्रेम करतात. जर तुम्हीही तुमच्या घरात मोठे असाल आणि तुमचंही लहान भावंडं असेल तर तुम्हाला वाटणारी गोष्ट तंतोतंत खरी आहे. असं आम्ही नाही सांगत आहोत. तर ही गोष्ट एका सर्वेमधून सिद्ध झाली आहे. आई-वडिलांसाठी आपलं लहान मुलचं सर्वात लाडकं असतं. त्याच्यासाठी अनेकदा ते पक्षपातही करतात. 

61% लोकांनी मानलं की, सर्वात लहान मुलं आहे आवडतं

एका ऑनलाइन पॅरेटिंग पोर्टल मम्सनेटने आपले 1 हजार 185 यूजर्स जे पॅरेंट्स आहेत त्यांच्यावर एक सर्व्हे करण्यात आला. ज्यामध्ये जवळपास एक चतुर्थांश पालकांनी आपल्या मुलांमधील कोणा एकाला आपलं फेवरेट असण्याच्या गोष्टीला दुजोरा दिला. त्यातील 61 टक्के पालकांचं हेच म्हणणं होतं की, त्यांचं सर्वात लहान मूलचं त्यांना जास्त आवडतं. तेच फक्त 26 टक्के पालकांनी आपलं मोठं मूल आपलं फेवरेट असल्याचं सांगितलं. 

पालकांना त्यांच्या लहानपाची आठवण करून देतं लहान मूल 

आपल्या मूलांमधीस कोणा एका मूलाला जास्त प्रेफरंस देणाऱ्या आई-वडिलांमध्ये 41 टक्के लोकांचं म्हणणं होतं की, त्यांचं फेवरेट मूल त्यांना त्यांच्या लहानपणीची आठवण करून देतं. तसच अर्ध्यापेक्षा जास्त पालकांच म्हणणं होतं की, त्यांचं आवडतं मूल त्यांना दुसऱ्या मूलांच्या तुलनेत जास्त हसवतं आणि खूश ठेवतं. याबाबत अनेक आई-वडिलांचं असं म्हणणं आहे की, पालकांनी आपल्या मुलांमध्ये पक्षपात अजिबात करू नये. सर्वेमध्ये सहभागी झालेल्या तीन चतुर्थांश पालकांचं असं मत होतं की, जर आई-वडिल मुलांमध्ये भेदभाव करत असतील तर याचा दुसऱ्या मुलांवर नकरात्मक प्रभाव पडू शकतो. 

टिप : वरील सर्व गोष्टी सर्व्हेमधून सिद्ध झाल्या आहेत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. 


Web Title: New study claims that youngest child tends to be parents favorite
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.