8 वर्षांच्या पुढील मुलं सांताक्लॉजवर विश्वास ठेवत नाही - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 04:22 PM2018-12-17T16:22:23+5:302018-12-17T16:22:45+5:30

बघता बघता 2018 वर्ष संपून थोड्याच दिवसांत नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. परंतु यापूर्वी सर्वांना वेध लागले आहेत ते म्हणजे ख्रिसमसचे. अगदी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच या दिवसाचे वेध लागलेले असतात.

New study claims kids stop believing in santa at the age of 8 | 8 वर्षांच्या पुढील मुलं सांताक्लॉजवर विश्वास ठेवत नाही - रिसर्च

8 वर्षांच्या पुढील मुलं सांताक्लॉजवर विश्वास ठेवत नाही - रिसर्च

Next

बघता बघता 2018 वर्ष संपून थोड्याच दिवसांत नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. परंतु यापूर्वी सर्वांना वेध लागले आहेत ते म्हणजे ख्रिसमसचे. अगदी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच या दिवसाचे वेध लागलेले असतात. ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज येतो आणि मुलांना गिफ्ट्स देतो. हे मिथक असलं तरिही यावर फक्त लहान मुलंच नाही तर अनेक मोठी माणसंही विश्वास ठेवतात. ख्रिसमस ट्रिवर किंवा दरवाज्यावर सॉस्क लावण्यात येतात. यामागील हेतू म्हणजे, ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज येतो आणि त्या सॉस्कमध्ये आपल्याला पाहिजे ते गिफ्ट गुपचूप ठेवून जातो. परंतु तुम्ही हे ऐकून फार हैराण व्हाल की, सध्या लहान मुलांनीही सांताक्लॉजवर विश्वास ठेवणं बंद केलं आहे. 

34% वयस्कर व्यक्ती ठेवतात सांताक्लॉजवर विश्वास

एका सर्वेमधून एक थक्क करणारी गोष्ट समोर आली आहे की, 34 टक्के वयस्कर व्यक्तींची इच्छा असते की, त्यांना सांताक्लॉजने येऊन गिफ्ट द्यावं. परंतु त्यांना हेदेखील ठाऊक असतं की, सांताक्लॉज ही संकल्पना अस्तित्वातचं नाही, तरिदेखील अनेक यंगस्टर्स सांताक्लॉजवर विश्वास ठेवतात. या सर्वेमधून ही गोष्ट समोर आली आहे की, अनेक पालक मुलांना असं सांगून घाबरवण्याचा प्रयत्न करतात की, जर त्यांनी दंगामस्ती केली तर त्यांच नाव सांताक्लॉजच्या मस्तीखोर मुलांच्या यादीमध्ये जाऊ शकतं. आणि मग सांताकडून त्यांना कोणतंही गिफ्ट मिळणार नाही. परंतु मुलांचा यावर अजिबात विश्वास बसत नाही. 

(Image Creadit : aliexpress.com)

सांताक्लॉजबाबत बदलला लोकांचा विचार

यूके युनिव्हर्सिटी ऑफ एग्जिटरच्या सायकॉलॉजिस्ट प्रोफेसर क्रिस बॉयलने जगभरातील लोकांना विचारलं की, त्यांचा सांताबद्दलचा विचार कसा बदलला? यावर उत्तर देताना लोकांनी त्यांना सांगितलं की, जेव्हा त्यांना समजलं की सांता खरोखर तसा नाही जसा आपल्याला सांगितलं जातं, त्यावेळी त्यांचा सांताबाबतचा विचार बदलत गेला. याबाबत बॉयल यांना जगभरातून 1200 रिस्पॉन्स मिळाले, ज्यामध्ये जास्तीत जास्त वयस्कर लोक होते. ज्यांनी सांताबाबतच्या आपल्या लहानपणीच्या गोष्टी शेअर केल्या. 

72% पालक मुलांना सांताबाबत सांगतात

या सर्वेक्षणातून सिद्ध झाल्यानुसार, 50 टक्के लोकं अशी असतात जे सांताक्लॉजवर विश्वास ठेवत नाहीत. तर 34 टक्के लोक अशी असतात ज्यांना माहीत असतं की, सांता अस्तित्वातच नाही तरिही त्यांना असं वाटतं असतं की, सांता असावा. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळपास 34 टक्के लोकांनी उत्तर दिले की, सांतावर विश्वास ठेवल्यामुळे लहानपणी त्यांच्या वागण्याच्या पद्धतीत सुधारणा झाली. तर 47 टक्के लोकांनी असं सांगितलं की, सांताचं असणं किंवा नसणं यामुळे त्यांना अजिबात काहीच फरक पडत नाही. सर्वेक्षणानुसार, सांताक्लॉजवर विश्वास ठेवणं बंद करण्याचं प्रमाण 8 वर्षाच्या मुलांमध्ये जास्त दिसून आलं आहे. जवळपास 72 टक्के पालक असे आहेत ज्यांना हे माहीत आहे की, सांताक्लॉज एक मिथक आहे. तरिही ते फार उत्सुकतेने त्याबाबत आपल्या मुलांना सांगतात.  

Web Title: New study claims kids stop believing in santa at the age of 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.