ब्रेकअपचा कुणावर जास्त होतो 'इमोशनल अत्याचार'? कोण लवकर बाहेर पडतं अन् कुणाला लागतो जास्त वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 11:54 AM2019-06-13T11:54:13+5:302019-06-13T12:02:58+5:30

प्रेम आणि ब्रेकअप या दोन्ही गोष्टी सोप्या नसतात. ब्रेकअप झाल्यावर संबंधित व्यक्तीला खूप मानसिक त्रास होतो, पण जीवनात पुढे जाणंही तेवढंच महत्त्वाचं आहे.

Men or women who gets over a break up faster | ब्रेकअपचा कुणावर जास्त होतो 'इमोशनल अत्याचार'? कोण लवकर बाहेर पडतं अन् कुणाला लागतो जास्त वेळ?

ब्रेकअपचा कुणावर जास्त होतो 'इमोशनल अत्याचार'? कोण लवकर बाहेर पडतं अन् कुणाला लागतो जास्त वेळ?

Next

(Image Credit : Vixen Daily)

प्रेम आणि ब्रेकअप या दोन्ही गोष्टी सोप्या नसतात. ब्रेकअप झाल्यावर संबंधित व्यक्तीला खूप मानसिक त्रास होतो, पण जीवनात पुढे जाणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. मात्र ब्रेकअपमधून सावरून पुढे जाण्याला प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो. यावर विज्ञानही हेच सांगतो की, मना दुखावलं जाणं हे पुरूष आणि महिलांना वेगवेगळ्या प्रकार प्रभावित करतं आणि दोघांनी यातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने परिस्थितीला समजून घ्यावं लागतं.

मजेदार बाब ही आहे की, महिलांना ब्रेकअपनंतर अधिक भावनात्मक आणि शारीरिक रूपाने अधिक त्रास होतो, पण त्या पुरूषांच्या तुलनेत अधिक वेगाने पुढे सरकतात. चला जाणून घेऊ महिला आणि पुरूषांना ब्रेकअप कशाप्रकारे प्रभावित करतं.

रिसर्च काय सांगतो?

हा रिसर्च मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. बिंघमटन युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या अभ्यासकांनी ९६ देशांतील ५ हजार ७०५ लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांना १ ते १० स्केलवर ब्रेकअपनंतर इमोशनल आणि फिजिकल वेदना सहन करण्याच्या क्षमतेला रॅंक करण्यास सांगण्यात आलं.

महिलांवर काय होतो प्रभाव?

रिसर्चनुसार, ब्रेकअप महिलांना अधिक नकारात्मक रूपाने प्रभावित करतं. भावनिक आणि शारीरिक दोन्ही रूपाने तुटल्यानंतर मुलीही आतून तुटतात. ब्रेकअफनंतर सहभागी महिलांना ६.८४ रेट केलं गेलं तर पुरूषांना ६.५८ रेट केलं गेलं. त्यासोबतच महिलांनी शारीरिक वेदना सरासरी ४.२१ टक्के तर पुरूषांनी याला ३.७१ रेट केलं.

(Image Credit :Huffington Post Australia)

यातून हे समोर आलं की, महिलांना ब्रेकअपनंतर भावनात्मक आणि शारीरिक रूपाने अधिक त्रास होतो, पण त्या या त्रासातून लगेच बाहेर पडतात आणि मजबूत होता.

पुरूषांची स्थिती काय असते?

रिसर्चनुसार, महिला त्यांच्या भावना चांगल्याप्रकारे व्यक्त करतात आणि एक नात्यातील त्यांच्या आणि त्यांच्या पार्टनरच्या गरज चांगल्या प्रकारे समजतात. तर पुरूषांची ब्रेकअपमधून बाहेर पडण्याची पद्धत फार वेगळी असते. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, पुरूषांना ब्रेकअपबाबत एकतर काहीच जाणवत नाही किंवा ते मद्य वा इतर नशेच्या पदार्थांचा आधार घेतात. ते त्यांच्या नात्याच्या सत्यापासून दूर पळणे पसंत करतात.

पुरूषांना लागतो जास्त वेळ

रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, पुरूष महिलांच्या तुलनेत ब्रेकअपमधून बाहेर पडण्यास अधिक वेळ घेतात आणि त्यांना पुढे जाण्यासही अधिक संघर्ष करावा लागतो. तसेच अभ्यासकांनी सांगितले की, या स्थितीत जैवविज्ञान कशी भूमिका निभावतं आणि सल्ला दिला की, महिलांना पुरूषांच्या तुलनेत त्यांच्यां नात्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. महिलांवर नात्यांची जास्त जबाबदारी असते आणि यामुळे त्यामुळे ब्रेकअप झाल्यावर त्यांना दु:खंही होतं.

दोघांमध्ये फरक का?

(Image Credit : Talkspace)

आश्चर्याची बाब ही आहे की, पुरूषांना त्यांच्या पार्टनरच्या जाण्याने होणारा त्रास हो जरा उशीरा होतो. जेव्हा त्यांना या गोष्टीची जाणीव होते की, त्यांची पार्टनर त्यांच्यापासून फार दूर गेली आहे तेव्हा त्यांना जास्त त्रास होतो. अभ्यासक क्रेग सांगतात की, पुरूषांना ब्रेकअपचा त्रास मनाच्या खोलवर होतो आणि ते जास्त काळासाठी या दु:खात राहतात. तसेच महिलांनाही याचा त्रास खूप होतो, पण त्या यातून बाहेर लवकर पडतात.

Web Title: Men or women who gets over a break up faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.