पहिली डेट शेवटची ठरु नये यासाठी खास डेटिंग टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 03:28 PM2018-04-28T15:28:21+5:302018-04-28T15:41:18+5:30

पहिल्या डेटला जाताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया काही खास टिप्स ज्या तुमची पहिली डेट यादगार आणि रोमॅंटिक करतील. 

Don't do these mistake on your first date | पहिली डेट शेवटची ठरु नये यासाठी खास डेटिंग टिप्स

पहिली डेट शेवटची ठरु नये यासाठी खास डेटिंग टिप्स

Next

आपल्या फर्स्ट डेटसाठी प्रत्येक व्यक्ती उत्साही असतो. काही लोक इतके उत्साही असतात की, यासाठी कित्येक दिवसापासून तयारीही करतात. पण कधी कधी प्रमाणापेक्षा जास्त तयारी करणेही तुमच्यासाठी धोक्याचं ठरु शकतं. काही लोक उत्साहाच्या भरात काहीही करुन बसतात त्यानेही तुमचं काम फिस्कटू शकतं. त्यामुळे पहिल्या डेटला जाताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया काही खास टिप्स ज्या तुमची पहिली डेट यादगार आणि रोमॅंटिक करतील. 

1) सर्वातआधी हे ध्यानात ठेवा की, स्वत:च्या चॉईसवर आत्मविश्वास असणारे मुलं मुलींना अधिक पसंत असतात. तुम्हाला स्वत:वर आत्मविश्वास ठेवाव लागेल. त्यामुळे तिला डेटला घेऊन जाताना आत्मविश्वासाने तिला आवडेल अशीच जागा निवडा.

2)  जर तुम्ही तुमच्या डेटला म्हणाल की, तुम्हाला नर्व्हस फिल होतंय तर ती तुमच्यावर दया करेल. तुमच्यासोबत जरा जास्तच चांगलं वागेल. पण याचा अर्थ हा नाही की, ती तुम्हाला लाईक करते. त्यामुळे तुम्ही आहात तसे राहा आणि नॉर्मल वागणूक ठेवा.

3) असे म्हणतात की, तुमचं पहिलं इम्प्रेशन तुमच्या ड्रेसिंग स्टाईलने पडतं. त्यामुळे पहिल्या डेटला जाताना स्वच्छ आणि चांगले कपडे परिधान करा. भडक किंवा तुम्ही विचित्र वाटाल असे कपडे मुळीच परिधान करु नका.

4) पहिल्या डेटचं वातावरणच असं असतं की, तुमची चुकी तुमच्या पार्टनरवर आणि तुमच्या पार्टनरची चुकी तुमच्यावर परिणाम करु शकते. अशात हळू आवाजात आणि अदबीने बोला.

5) जर तुम्ही पहिल्यांदाच डेटला जात असाल आणि ऐकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखत नसाल तर ही डेट कंटाळवाणी होऊ देऊ नका. ओळखत नाही म्हणून तोंड बंद करुन गप्प बसू नका. एकमेकांना जाणून घेता येईल, असं काहीतरी बोलत राहा.

6) जोपर्यंत तिच्या आवडी-निवडी कळत नाही तोपर्यंत तिला सरप्राईज देण्याची चूक करु नका. नाहीतर तिला चुकून दुखावलं गेलं तर तुम्हालाच महागात पडेल.

7) सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलीसोबत तुम्ही पहिल्यांदाच डेटला जाताय, तिच्यासमोर चुकूनही तुमच्या एक्सचा विषय काढू नका. नाहीतर तुम्ही ही पहिली डेट लास्ट डेट ठरेल.

8) अनेक मुलींना मुलांच्या चेहऱ्यापेक्षा त्यांची हुशारी आणि स्मार्टनेस आवडतो. त्यामुळे तिला भेटल्यावर योग्य वागणूक ठेवा. 

9) पहिल्याच डेटला गेल्यावर तुम्ही सोबत असलेल्या मुलीकडे अधिक लक्ष केंद्रीत करा. उगाच आजूबाजूला असलेल्या दुसऱ्या मुलींकडे नजरा फिरवू नका. पहिली डेट शेवटची ठरणार नाही याची काळजी घ्या. 

10) पहिल्या भेटीनंतर लगेच कॉल करु नका आणि मेसेज पण करु नका. विचार करण्यासाठी तिला काही वेळ द्या.
 

Web Title: Don't do these mistake on your first date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.