चिपळूणमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का

By admin | Published: May 26, 2017 07:18 PM2017-05-26T19:18:35+5:302017-05-26T19:19:22+5:30

सेनेच्या सुरैया फकीर ७६ मतांनी विजयी * भाजपाच्या नेहा भालेकर यांचा पराभव * राष्ट्रवादीच्या ममता नेवरेकर यांना केवळ १६९ मते * सेनेला राष्ट्रवादीसह काँग्रेसचा छुपा पाठींबा

Shivsena's BJP push in Chiplun | चिपळूणमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का

चिपळूणमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का

Next

लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : शहरातील प्रभाग क्र. ९ अ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने सत्ताधारी भाजपला धक्का देत विजय मिळविला. शिवसेनेच्या सुरैया महंमद फकीर यांनी भाजपाच्या नेहा अजय भालेकर यांचा ७६ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ममता नेवरेकर यांना केवळ १६९ मतांवर समाधान मानावे लागले. आज शुक्रवारी सकाळी चिपळूण नगर परिषदेच्या श्रावणशेठ दळी सभागृहात पोलीस बंदोबस्तात निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना जगताप-भोसले व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत शिवसेनेच्या फकीर यांना ३३१ तर भाजपाच्या भालेकर यांना २२५ मते मिळाली. १०६ मतांची निर्णायक आघाडी सेनेला मिळाली. दुसऱ्या फेरीत सेनेच्या फकीर यांना २३२ तर भाजपाच्या भालेकर यांना २५१ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत सेनेची आघाडी घटली व १९ वर आली. तिसऱ्या फेरीत सेनेच्या फकीर यांना १७६ तर भाजपाच्या भालेकर यांना २८६ मते मिळाली. तिसऱ्या फेरीत भाजपने केवळ २३ मतांची आघाडी घेतली. चौथ्या फेरीत शिवसेनेच्या फकीर यांना २७७ तर भाजपाच्या भालेकर यांना १७८ मते मिळाली. त्यामुळे फकीर या ७६ मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. शिवसेनेचा विजय झाल्याचे घोषित करताच सभागृहाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन फटाक्यांची आतषबाजी केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, शहरप्रमुख राजेश देवळेकर, नगर परिषदेचे गटनेते शशिकांत मोदी, युवासेनेचे तालुका अधिकारी उमेश खताते, मागासवर्गीय सभापती उमेश सकपाळ, नगरसेविका सई चव्हाण, नगरसेवक भगवान बुरटे, मनोज शिंदे, महिला संघटक रश्मी गोखले, स्वाती दांडेकर, सुषमा कासेकर, नगरसेवक मोहन मिरगल यांच्यासह उमेदवार सुरैया फकीर व त्यांचे पती माजी नगरसेवक महंमद फकीर हे या जल्लोषात सहभागी झाले होते. या प्रभागात एकूण ३ हजार ६३३ मतदार होते. त्यापैकी २१५० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी फकीर यांना १०१६, भाजपाच्या भालेकर यांना ९४० तर राष्ट्रवादीच्या नेवरेकर यांना १६९ मते मिळाली. २५ लोकांनी नोटाचा पर्याय निवडला. चौकट काँग्रेस, राष्ट्रवादीचा सेनेला पाठिंबा? शिवसेनेच्या सुरैया फकीर विजयी झाल्याचे घोषित होताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर इंदिरा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी काँगे्रस व राष्ट्रवादी आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी छुपा पाठिंबा दिल्याचे उघड झाले. आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, गटनेते शशिकांत मोदी, शहरप्रमुख राजू देवळेकर, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, उमेश सकपाळ, उमेश खताते यांनी फकीर यांचे अभिनंदन केले. चौकट कोण काय म्हणाले... हा कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा विजय असून, ही परिवर्तनाची नांदी आहे. - आमदार सदानंद चव्हाण या विजयाबद्दल अतिशय आनंदी आहे. मनापासून काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार - जिल्हाप्रमुख सचिन कदम भाजपाला हा अपशकुन आहे. कालच मुख्यमंत्र्यांचे विमान कोसळून अपशकुन समोर आला होता. - विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम शिवसेनेसह सर्वपक्षांनी दिलेल्या सहकार्याचा हा विजय आहे. - शहरप्रमुख राजू देवळेकर ----नगराध्यक्षांच्या घरात जाऊन आम्ही हा विजय खेचून आणला त्यामुळे त्यांचे नाक कापले आहे. - रश्मी गोखले

Web Title: Shivsena's BJP push in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.