रत्नागिरी : टोल एकांकिकेने पटकावला शामराव करंडक, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 04:35 PM2017-12-23T16:35:21+5:302017-12-23T16:39:35+5:30

अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवची सांगता पारितोषिक वितरणाने झाली. तीन दिवसांच्या या कला, क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना संधी मिळाली. छंदोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शामराव करंडक एकांकिका स्पर्धेतील उर्वरीत एकांकिकांचे सादरीकरण झाले तसेच समूह नृत्य स्पर्धा पार पडल्या.

Ratnagiri: The toll was won by Ekanikekar Shamrao Karandak, Abhiyankar-Kulkarni Junior College's Chhandotsav | रत्नागिरी : टोल एकांकिकेने पटकावला शामराव करंडक, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवची सांगता

रत्नागिरी एकांकिका स्पर्धेत चौकट क्रिएशन ग्रुपच्या टोल एकांकिकेने शामराव करंडक पटकावला.

Next
ठळक मुद्देचौकट क्रिएशन ग्रुपच्या टोल एकांकिकेने पटकावला शामराव करंडकघंटानाद सन्मान स्मितल मिलिंंद चव्हाण हिला प्रदान विविध गुणवंतांच्या बक्षीस वितरणाने छंदोत्सवाची सांगता

रत्नागिरी : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवची सांगता पारितोषिक वितरणाने झाली. तीन दिवसांच्या या कला, क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना संधी मिळाली. छंदोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शामराव करंडक एकांकिका स्पर्धेतील उर्वरीत एकांकिकांचे सादरीकरण झाले तसेच समूह नृत्य स्पर्धा पार पडल्या. यावर्षी चौकट क्रिएशन ग्रुपच्या टोल या एकांकिकेने शामराव करंडक पटकावला.

तिसऱ्या दिवसाचा घंटानाद सन्मान अभिनय क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेल्या स्मितल मिलिंंद चव्हाण हिला प्रदान करण्यात आला. तसेच पूर्वा किनरे, सृष्टी जाधव, अपूर्वा नाचणकर, प्रियांका चव्हाण या विद्यार्थिनींना राज्य, राष्ट्रीय स्तरावरील विविघ क्रीडा प्रकारातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले.

एन. सी. सी. कॅडेट सिध्देश सुनील शिंंदे याला उत्तम कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. छंदोत्सवाची सांगता विविध गुणवंतांच्या बक्षीस वितरणाने झाली.

यावेळी साक्षी कोतवडेकर आणि ऋग्वेद जाधव यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच मानाचा समजला जाणारा मंगलमूर्ती पुरस्कार सिद्धी भवरसिंंग दसाणा हिला प्रदान करण्यात आला.

आदर्श विद्यार्थी म्हणून ओंकार अंकुश वाळुंज आणि आदर्श विद्यार्थिनी म्हणून प्राजक्ता श्रीरंग वैद्य यांना सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून मृदुला देवस्थळी हिला गौरविण्यात आले. या महोत्सवालामुळे महाविद्यालयातील तरूणाईमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत होते.

शामराव करंडक एकांकिका स्पर्धा

प्रकाश योजना : प्रथम - सौरभ आपटे (एक अपूर्व शोध) द्वितीय गिरीश मधुकर चव्हाण (भिंंत) तृतीय तन्वी संतोष साळवी (टोल)

सर्वोत्कृष्ट तांत्रिक अंगे - टोल (एकांकिका) चौकट क्रिएशन्स, सर्वोकृष्ट,

नेपथ्य : प्रथम मिथील रवींद्र केदार, द्वितीय शुभम उमेश आंब्रे (भिंंत), तृतीय अथर्व अतुल देशपांडे (रात्र बनोळखी),

सर्वोत्कृष्ट लेखन - प्रथम ऋषिकेश अनंत फणसोपकर (टोल), द्वितीय साक्षी योगेश पंडित (नाव विकत घेवाक), तृतीय अथर्व विवेक भिडे (रात्र अनोळखी),

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - प्रथम संतोष तेजस साळवी (टोल), द्वितीय शुभव अशोक गोविलकर (भिंंत), तृतीय सुकन्या अरविंंद ओळकर,

सर्वोत्कृष्ट संगीत : प्रथम रवी शिवानी राठोड (नाव विकत घेवाक), द्वितीय प्रवीण सुरेश कोलापटे (टोल), तृतीय ऐश्वर्या दिलीप जागुष्टे,

उकृष्ट अभिनेता - प्रथम शुभम अशोक गाविलकर (भिंत), द्वितीय मिथील रवींद्र केदार (टोल), तृतीय प्रवीण प्रकाश माहिते (नाव विकत घेवाक)

उत्कृष्ट अभिनेत्री - प्रथम प्रियांका राजाराम पावसकर, द्वितीय सुकन्या अरविंंद ओळकर, तृतीय जान्हवी जितेंद्र आगरे,

उत्कृष्ट एकांकिका - प्रथम टोल (चौकट क्रिएशन), द्वितीय भिंंत (रत्नभूमी क्रिएशन), तृतीय नाव विकत घेवाक (एन. एस. एस. वक्रतुंड)
 

Web Title: Ratnagiri: The toll was won by Ekanikekar Shamrao Karandak, Abhiyankar-Kulkarni Junior College's Chhandotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.