चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; २३ जण वाहून गेल्याची भीती, दोघांचे मृतदेह सापडले, बचावकार्य सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 12:01 AM2019-07-03T00:01:07+5:302019-07-03T06:42:16+5:30

चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे.

Ratnagiri - - Tiger dam overflow, damper bridge under water | चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; २३ जण वाहून गेल्याची भीती, दोघांचे मृतदेह सापडले, बचावकार्य सुरु

चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; २३ जण वाहून गेल्याची भीती, दोघांचे मृतदेह सापडले, बचावकार्य सुरु

Next
ठळक मुद्देएक पूर्ण  वाडी वाहून गेली असून २३ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांशी संपर्क तुटला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे.

रत्नागिरी :  चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील एक पूर्ण  वाडी वाहून गेली असून २३ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती मदत पथकाला पाचारण करण्यात आले असून वाहून गेलेल्यांपैकी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. धरणानजीकचा दादर पूल पाण्याखाली आला असून, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांशी संपर्क तुटला आहे. पाऊस वाढला तर हे धरण फुटण्याची भीती आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. सह्याद्री खोऱ्यामध्येही पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिवरे धरण भरून वाहू लागले. धरणात मोठा पाणीसाठा झाल्याने त्यात अजून पावसाची भर पडली तर धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली असून, परिस्थितीचे अवलोकन केले जात आहे.या धरणाचे ओव्हरफ्लो होणारे पाणी शास्त्री नदी आणि वाशिष्ठीच्या खाडीला मिळत असल्याने त्याचा ग्रामस्थांना धोका नसल्याची माहिती मिळत आहे.



 

हे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने जवळच असलेला दादर पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे चिपळूणाचा आकले, रिक्टोली, कळकवणे, ओवळी या गावांशी असलेला संपर्क पूर्ण तुटला आहे. तिवरे धरण ओसंडून वाहू लागल्याने एक पूर्ण वाडी वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. २३ जण या पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज एका अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण घटनास्थळी रवाना झाले आहेत.

नदिकिनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा -माजी सभापती  जितेंद्र चव्हाण रामपूर यांची माहीती -- दसपटी तिवरे ते पाणी वाशिष्टी नदीला मिळते त्याठिकाणी  नायब तहसीलदार , मंडळ अधिकारी ,तलाठी आणि सार्व बांधकामचे अधिकारी पोहचलेत , बाधित गावे वालोटी , दळवटने ,गाणे ,सती ,चिंचघरी , खेर्डी ,चिपळूण अशी आहेत.

Web Title: Ratnagiri - - Tiger dam overflow, damper bridge under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.