रत्नागिरी : आॅनलाईन पैसे लांबवणाऱ्याला ठकसेनाला बिहार येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 04:55 PM2018-08-07T16:55:27+5:302018-08-07T16:59:05+5:30

बँकेचा मॅनेजर बोलतोय, असे सांगून बँक ग्राहकाचा एटीएम नंबर मागून घेतल्यानंतर या १६ अंकी एटीएम नंबरच्या मदतीने ग्राहकाच्या खात्यातील ३६ हजार ४३२ रुपये आॅनलाईन काढून घेणाऱ्या ठकसेनाला पूर्णगड पोलिसांनी बिहार येथून अटक केली आहे.

Ratnagiri: Thaksena, arrested for online money, was arrested from Bihar | रत्नागिरी : आॅनलाईन पैसे लांबवणाऱ्याला ठकसेनाला बिहार येथून अटक

रत्नागिरी : आॅनलाईन पैसे लांबवणाऱ्याला ठकसेनाला बिहार येथून अटक

ठळक मुद्देग्राहकाच्या खात्यातील ३६ हजार ४३२ रुपये आॅनलाईन लंपासपूर्णगड पोलिसांनी ठकसेनाला बिहार येथून केली अटक

पावस :बँकेचा मॅनेजर बोलतोय, असे सांगून बँक ग्राहकाचा एटीएम नंबर मागून घेतल्यानंतर या १६ अंकी एटीएम नंबरच्या मदतीने ग्राहकाच्या खात्यातील ३६ हजार ४३२ रुपये आॅनलाईन काढून घेणाऱ्या ठकसेनाला पूर्णगड पोलिसांनी बिहार येथून अटक केली आहे.

सुरेश नारायण गोरे (३२, डोर्ले धनगरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १७ जुलै रोजी गोरे यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. संबंधिताने आपण पूर्णगड येथून बँक आॅफ इंडियाचा मॅनेजर बोलतोय, तुमच्या एटीएमचा सोळा अंकी नंबर हवा आहे, असे सांगून गोरे यांच्याकडून एटीएमचा नंबर मागून घेतला.

त्यानंतर गोरे यांच्या खात्यातून ३६ हजार ४३२ रुपये आॅनलाईन काढून घेतल्याचे दिसून आले. याप्रकरणी गोरे यांनी १८ जुलै रोजी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द तक्रार दिली होती.

सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी एक पथक बिहार राज्यात तपासासाठी पाठवले होते. या पथकाने मनोजकुमार मितन दास याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Web Title: Ratnagiri: Thaksena, arrested for online money, was arrested from Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.