रत्नागिरी : गणपतीपुळे मंदिराला मिळाले आय एस ओ प्रमाणपत्र, देवस्थानने तयार केली कोंकण दर्शन सीडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 06:19 PM2018-01-27T18:19:34+5:302018-01-27T18:26:35+5:30

गणपतीपुळे देवस्थानला आय एस ओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे,. या प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज गणपतीपुळे येथे पार पडला. आता गणेशभक्तांना गणपतीपुळे मंदिरात होणारी रोज दुपारची आरती ऑनलाईन पाहता येणार आहे. या ऑनलाईन आरतीचा शुभारंभही आज झाला.

 Ratnagiri: Receipt of the temple from Ganatipule temple, Devasthan prepared by Konkan Darshan CD | रत्नागिरी : गणपतीपुळे मंदिराला मिळाले आय एस ओ प्रमाणपत्र, देवस्थानने तयार केली कोंकण दर्शन सीडी

रत्नागिरी : गणपतीपुळे मंदिराला मिळाले आय एस ओ प्रमाणपत्र, देवस्थानने तयार केली कोंकण दर्शन सीडी

googlenewsNext
ठळक मुद्दे मंदिरात आता रोज दुपारची आरती ऑनलाईनमोबाईल अँप सुरू, मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ

रत्नागिरी : गणपतीपुळे देवस्थानला आय एस ओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज गणपतीपुळे येथे पार पडला. आता गणेशभक्तांना गणपतीपुळे मंदिरात होणारी रोज दुपारची आरती ऑनलाईन पाहता येणार आहे. या ऑनलाईन आरतीचा शुभारंभही आज झाला.

दरवर्षी चाळीस लाखाहून अधिक भाविक गणपतीपुळ्यात दर्शनासाठी येतात. गणपतीपुळे देवस्थानने गेल्या काही वर्षांत नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत. सुसज्ज असा भक्तनिवास, आधुनिक युगात भाविकांसाठी गणपतीपुळे देवस्थानने मोबाईल अँप सुरू केले. आज गणपती देवस्थानच्या कामाची दखल घेऊन त्याना आय एस ओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते श्री देव गणपतीपुळे देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत,नगराध्यक्ष राहूल पंडित, अँड. बाबा परुळेकर,महेश मालपाठक,जि.प.सदस्या साधना साळवी व इतर मान्यवर उपस्थित होते.

गणपतीपुळे मंदिरात दुपारी बारा वाजता होणारी आरती आता देवस्थानच्या अँपवर भाविकांना पाहता येणार आहे. तसेच कोंकणातील विविध पर्यटन स्थळांची माहिती सांगणारी कोंकण दर्शन ही सीडी देवस्थानने तयार केली आहे. या दोन्ही उपक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला.

यावेळी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी गणपतीपुळे देवस्थानच्या कामाचे कौतुक करताना देवस्थानने आता मंदिर व्यवस्थापन हा अभ्यासक्रम सुरू करावा अशी सूचना त्यांनी व्यक्त केली.

Web Title:  Ratnagiri: Receipt of the temple from Ganatipule temple, Devasthan prepared by Konkan Darshan CD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.