रत्नागिरी :  मनाचे सामर्थ्य महत्त्वाचे, त्याची मशागत केली पाहिजे : प्रल्हाद पै

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 05:42 PM2018-02-26T17:42:51+5:302018-02-26T17:42:51+5:30

जीवनविद्या मिशन आयोजित हीरक महोत्सव वर्षांतर्गत लाईफ मॅनेजमेंट मालिकेचा २३ वा भाग रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रल्हाद पै यांनी पार्टनरशीप मनाची, गॅरंटी यशाची विषयावर मार्गदर्शन केले.

Ratnagiri: The power of the mind is important, it should be cultivated: Prahlad Pa | रत्नागिरी :  मनाचे सामर्थ्य महत्त्वाचे, त्याची मशागत केली पाहिजे : प्रल्हाद पै

रत्नागिरी :  मनाचे सामर्थ्य महत्त्वाचे, त्याची मशागत केली पाहिजे : प्रल्हाद पै

Next
ठळक मुद्देजीवनविद्या मिशन आयोजित हीरक महोत्सव वर्षरत्नागिरीत लाईफ मॅनेजमेंट मालिकेचा २३ वा भाग

रत्नागिरी : जो देतो तो देव म्हणून गुरू, सद्गुरू हा देव इतकेच नव्हे तर राष्ट्र, विश्वात्म हा देव आहे. त्यामुळे जगणं हे विश्वावर, निसर्गावर, संपूर्ण ब्रह्मांडावर अवलंबून असले पाहिजे. सर्वांप्रती कृतज्ञतादेखील महत्त्वाची आहे. जीवन जगताना समाधान, कृतज्ञतेच्या अधिष्ठानावर प्रयत्नाचा पूल बांधला पाहिजे. म्हणून मनाचे सामर्थ्य सर्वात महत्त्वाचे आहे, त्याची चांगली मशागत करून चांगले विचार केले पाहिजेत. सर्वांसाठी मागतो तो सर्वात मोठा विचार, असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांनी केले.

जीवनविद्या मिशन आयोजित हीरक महोत्सव वर्षांतर्गत लाईफ मॅनेजमेंट मालिकेचा २३ वा भाग रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रल्हाद पै यांनी पार्टनरशीप मनाची, गॅरंटी यशाची विषयावर मार्गदर्शन केले.

प्रत्येक व्यक्तीबरोबर मन असतं. मात्र, त्याला पार्टनर करून घ्यावं अथवा न घ्यावं हे ज्याने-त्याने ठरवायचं असतं. यश अथवा अपयशाचे कारण मन आहे. मनाच्या सामर्थ्याचा वापर करून यश मिळवले जाते. काहीवेळा माहीत नसल्याने नकळत नशीब बिघडवले जाते. मनाला कंट्रोल करणे शिकले पाहिजे.

मानवी मन एका बाजूने ईश्वराकडे तर दुसऱ्या बाजूने शरीरामार्फत जगाशी जोडले गेले आहे. मनाची ताकद ही ईश्वराकडून येते. ईश्वर म्हणजेच अखंड ऊर्जा आहे. तिला आत्मशक्ती किंवा चैतन्यशक्ती म्हणून संबोधले जाते. विश्वनिर्मितीचे सामर्थ्य ईश्वराकडे आहे. मनाचे पाच प्रकार असले तरी अंतर्मन व बहिर्मन हे एकाच मनाचे दोन भाग आहेत व त्यांची कार्यपध्दती वेगळी असल्याचे प्रल्हाद पै यांनी सांगितले.

यश हा एक प्रवास आहे. प्रत्येक पातळीवरचे यश वेगवेगळे आहे. ते मिळवण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. विचार अंतर्मनाला पटणारे पाहिजेत. यश मिळते तेव्हाच अंतर्मनावरील विश्वास वाढवला पाहिजे. कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. शिवाय आत्मविश्वासही गरजेचा आहे. उद्दिष्ट साध्य करण्याची सवय होते, तेव्हा आत्मविश्वास नक्की वाढतो. त्यामुळे जेवढे कृतज्ञ तेवढे समाधान मिळेल.

यश मिळाल्यावर खाली, वर न पाहता समाधानी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने महत्त्वाकांक्षी असणे आवश्यक आहे. यश मिळवण्यासाठी आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्यक्ती जेवढी समाधानी, कृतज्ञ तेवढे बळ अधिक प्राप्त होते. कृतज्ञतेच्या अधिष्ठानावर पुढील पायरी चढण्याची तयारी ठेवली पाहिजे.

प्रामाणिक राष्ट्रभक्ती न सोडता, विधायक महत्त्वाकांक्षा असणे आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीने समोरच्या व्यक्तीबाबत कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. भलं म्हणणंदेखील भावना आहे. दुसऱ्याच्या द्वेषात स्वत:चे नुकसान करण्यापेक्षा आदर केला तरच सुखप्राप्ती होईल. शिवाय देण्याची कृतीदेखील महत्त्वाची आहे, असेही प्रल्हाद पै म्हणाले.

नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते रत्नागिरीवासियांतर्फे प्रल्हाद पै यांचा मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, उद्योजक नाना भिडे, सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक उपस्थित होते. मानपत्र वाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा पवार यांनी केले.

Web Title: Ratnagiri: The power of the mind is important, it should be cultivated: Prahlad Pa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.