रत्नागिरी : केसरकरांचा दबावामुळेच १८ तासानंतरही गुन्हा दाखल नाही : नीलेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 02:57 PM2018-08-24T14:57:46+5:302018-08-24T14:59:46+5:30

स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्याला दोन दिवसांपूवी एका दूरचित्रवाहिनीच्या कार्यक्रमात सेनेच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरीत मारहाण केली होती. त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करून तब्बल १८ तास उलटले तरी रत्नागिरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला नाही.

Ratnagiri: An FIR has not been lodged even after 18 hours due to pressure of Kesarkar: Nilesh Rane | रत्नागिरी : केसरकरांचा दबावामुळेच १८ तासानंतरही गुन्हा दाखल नाही : नीलेश राणे

रत्नागिरी : केसरकरांचा दबावामुळेच १८ तासानंतरही गुन्हा दाखल नाही : नीलेश राणे

ठळक मुद्देकेसरकरांचा दबावामुळेच १८ तासानंतरही गुन्हा दाखल नाही नीलेश राणे यांचा पत्रकार परिषदेत आरोप

रत्नागिरी : स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्याला दोन दिवसांपूवी एका दूरचित्रवाहिनीच्या कार्यक्रमात सेनेच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरीत मारहाण केली होती. त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करून तब्बल १८ तास उलटले तरी रत्नागिरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला नाही.

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या दबावामुळे असे घडत असूून आम्ही शांत बसणार नाही. गृहराज्यमंत्री सेनेचे असले तरी मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही जाऊ शकतो. त्यामुळे सेनेने आमच्या नादाला लागू नये, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.

अमित देसाई या स्वाभिमानच्या कार्यकर्त्याला झालेल्या स्वाभिमानच्या कार्यकर्त्याला जिल्हा रुग्णालयात पाहण्यासाठी गेलो व गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस स्थानकात गेलो होतो यात कोणती दहशत आहे. सेनेचे आमदार राजन साळवी हे सुध्दा त्यावेळी पोलीस स्थानकात होते. त्यामुळे पोलिसांवर दबाव येत नाही काय, असा सवालही राणे यांनी केला.

स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांविरोधात दोन तासात गुन्हा दाखल होतो आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्याला धक्काबुक्की करणाऱ्यांविरोधात मागणी करूनही पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीत, हा पोलिसांवरील दबाव नाहीतर काय आहे, असा सवाल त्यांनी केला.

Web Title: Ratnagiri: An FIR has not been lodged even after 18 hours due to pressure of Kesarkar: Nilesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.