रत्नागिरीत सलग १२ तास रंगणार रागार्पण कार्यक्रम

By Admin | Published: July 13, 2017 04:48 PM2017-07-13T16:48:27+5:302017-07-13T16:52:41+5:30

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुग्धा भट-सामंत यांचे रागसमयचक्र

The Ragran program will be held for 12 hours in Ratnagiri | रत्नागिरीत सलग १२ तास रंगणार रागार्पण कार्यक्रम

रत्नागिरीत सलग १२ तास रंगणार रागार्पण कार्यक्रम

googlenewsNext

रत्नागिरी, दि. १३ : गजानन भट स्मृती प्रित्यर्थ येत्या रविवार, १६ रोजी रत्नागिरीत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुग्धा भट-सामंत आणि त्यांचा शिष्यवर्ग रागार्पण हा कार्यक्रम सादर करणार आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल बारा तास चालणारा रागसमयचक्र कार्यक्रमाचा हा दुसरा भाग आहे.

आई-वडील हे सर्वांचेच पहिले गुरू असतात. त्यांच्यामुळेच त्यांची मुले यश संपादन करू शकतात. मुग्धा भट-सामंत यांचीही तशीच धारणा असून, त्यांचे वडील कै. गजानन भट यांच्या स्मृतिला अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय संगीत शिकणाºया सर्व विद्यार्थ्यांना या संगीताची अधिकाधिक गोडी लागावी व हिंदुस्थानी गायन संस्कृतीचा पाया असलेल्या रागदारी संगीताकडे जास्तीत जास्त विद्यार्थी वळावा, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी १६ जुलै रोजी रागसमयचक्रावर आधारित अशा या कार्यक्रमाचा पहिला भाग अतिशय उत्तम पद्धतीने पार पडला. गेल्या वर्षी निशिगंध ते प्राजक्त हा संध्याकाळी ६ ते सकाळी ६ असा रात्रीच्या १२ तासांवर आधारित रागांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. रागसमयचक्रावर आधारित त्याच कार्यक्रमाचा रागार्पण हा दुसरा भाग यावर्षी सादर केला जाणार आहे. त्यामध्ये कोणीही व्यावसायिक कलाकार नाहीत. रत्नागिरीत शास्त्रीय संगीताची साधना करणारे विद्यार्थी हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

मुग्धा भट - सामंत आणि त्यांचे ८५ शिष्य गायन सादर करतील. संपूर्ण कार्यक्रमाला दहा साथीदार साथसंगत करतील. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ असा दिवसभराच्या १२ तासांचा हा रागार्पण कार्यक्रम येत्या रविवारी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात होणार आहे.

Web Title: The Ragran program will be held for 12 hours in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.