विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कोकण रेल्वेची कारवाई, वसूल केला 'इतक्या' कोटीचा दंड

By शोभना कांबळे | Published: January 15, 2024 06:06 PM2024-01-15T18:06:16+5:302024-01-15T18:07:33+5:30

दोषी आढळलेल्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार

Konkan Railway action against those traveling without tickets, 4.88 crores recovered during the year | विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कोकण रेल्वेची कारवाई, वसूल केला 'इतक्या' कोटीचा दंड

संग्रहित छाया

रत्नागिरी : कोकण रेल्वेने प्रवास करताना विना तिकीट प्रवास करणाऱ्या ७,०१३ प्रवाशांवर कोकण रेल्वे प्रशासनाने कारवाई करत महिनाभरात तब्बल १ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रुपयांचा दंड वसूल केला आहे. पाच महिन्यात २७,८३८ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून ४ कोटी ८७ लाख ८५ हजार १५२ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

गाडीला गर्दी असल्याची संधी साधून काही प्रवासी विना तिकीट गाडीत घुसतात. त्यामुळे रीतसर तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर अन्याय होतो. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाचे करोडो रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यासाठी आॅगस्ट २०२३ महिन्यापासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक महिन्याला कोकण रेल्वे प्रशासनाची ही कारवाई सुरू असते. डिसेंबर २०२३ या महिन्यात राबविलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत विना तिकीट प्रवास करणाऱ्या ६,६७५ प्रवाशांकडून १ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रूपयांचा दंड वसूल केला आहे.

ऑगस्ट ते डिसेंबर २०२३ या पाच महिन्यात करण्यात आलेल्या तिकीट तपासणीत २७,८३८ विनातिकीट प्रवासी आढळले. त्यांच्याकडून ४ कोटी ८७ लाख ८५ हजार १५२ रुपयांचा दंड४ कोटी ८७ लाख ८५ हजार १५२ रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. यापुढेही तिकीट तपासणी मोहीम नियमित सुरू रहाणार आहे. यात दोषी आढळलेल्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणारआहे.

कोकण रेल्वे आॅगस्ट २०२३ पासून सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. यापुढेही कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही धडक कारवाई सुरूच राहणार आहे. अभिमानाने प्रवास करा, सन्मानाने प्रवास करा, तिकीट खरेदी करा आणि अभिमानाने प्रवास करा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

तिकीट तपासणीची मोहीम कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर नियमित सुरू राहणार आहे. प्रवाशांनी योग्य व वैध तिकीटासह प्रवास करावा दंड टाळावा.- सचिन देसाई, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

Web Title: Konkan Railway action against those traveling without tickets, 4.88 crores recovered during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.