तेजस एक्स्प्रेसमधील 15 प्रवाशांना जेवणातून विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 05:11 PM2017-10-15T17:11:08+5:302017-10-15T17:19:10+5:30

देशातील सर्वात वेगवान ट्रेन असे बिरुद मिरवणाऱ्या कोकण रेल्वेवरील सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेसमध्ये जेवणातून 15 प्रवाशांना विषबाधा झाली आहे.

Food poisoning for 15 passengers in Tejas express | तेजस एक्स्प्रेसमधील 15 प्रवाशांना जेवणातून विषबाधा

तेजस एक्स्प्रेसमधील 15 प्रवाशांना जेवणातून विषबाधा

Next

रत्नागिरी : देशातील सर्वात वेगवान ट्रेन असे बिरुद मिरवणाऱ्या कोकण रेल्वेवरील सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेसमध्ये जेवणातून 15 प्रवाशांना विषबाधा झाली आहे. प्रवाशांना त्रास होऊ लागल्यानं तेजस एक्स्प्रेस चिपळूण स्थानकाजवळ थांबवण्यात आली आहे. या प्रवाशांना उपचारासाठी चिपळूणमधील लाईफकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशातील वेगवान एक्स्प्रेस म्हणून तेजस एक्स्प्रेस ओळखली जाते. करमाळीहून दर रविवारी तेजस सीएसटीच्या दिशेनं धावते. आज सकाळी आपल्या नियोजित वेळी तेजस निघाली मात्र चिपळूणजवळ पोचताच काही प्रवाशांना फूड पॉयझनिंगचा त्रास होऊ लागला. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तेजस एक्सप्रेस ही प्रवाशांना विमानप्रवासाचा फील देणारी, अत्याधुनिक ट्रेन आहे. तेजस एक्सप्रेस अगदी कमी वेळेतच लोकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. तेजस एक्स्प्रेसचा प्रत्येक डब्बा बनवण्यासाठी रेल्वेकडून 3 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तसंच या ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे, डब्ब्यांमझ्ये सीसीटीव्ही कॅमेरा, कॉल बेल, एलईडी टीव्ही, यूएसबी चार्जिंग या सगळ्या सुविधा प्रवाशांना अनुभवायला मिळत आहेत.

‘तेजस’मध्ये एक्झिक्युटिव्ह बोगीत 56 सीट आणि एसी बोगीत 936 सीट आहेत. प्रत्येक डब्यात 6 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ‘तेजस’ एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना अल्पोपहाराची सेवाही उपलब्ध करून दिली आहे. आयआरसीटीसीकडून ही सेवा सशुल्क देण्यात येणार आहे. ‘तेजस’मध्ये सायंकाळच्या अल्पोपहारात दाबेली, डाएट चिवडा, सामोसा, कोथिंबीर वडी मिळते. सकाळी ब्रेड बटरसह उपमा, पोहे, इडली, वडा मिळतो.


काय आहे तेजस एक्स्प्रेस?
200 किमी प्रतितास वेगाने धावणारी तेजस ही देशातील पहिली ट्रेन आहे. तेजस एक्स्प्रेसचा प्रत्येक डब्बा बनवण्यासाठी रेल्वेला 3 कोटी 25 लाख रुपये खर्च करावे लागले आहे. याचे दरवाजे स्वयंचलित आहेत. शिवाय यात सीसीटीव्ही कॅमेरा, कॉल बेल, एलईडी टीव्ही, यूएसबी चार्जिंग इत्यादी सुविधाही आहेत. ही ट्रेन आठवड्याच्या पाच दिवस धावणार धावते. ट्रेनला एकूण 7 थांबे आहेत. तेजस एक्स्प्रेस अवघ्या 8.30 तासात गोव्यातील करमाळी स्टेशनवर पोहोचते. तर पावळ्यात कोकणातील परिस्थिती पाहता ट्रेनला करमाळीला पोहोचण्यासाठी 10.30 तास लागतात.

Web Title: Food poisoning for 15 passengers in Tejas express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.