बंदोबस्तातील पोलिसांनी साफ केला घरातील चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:26 AM2019-07-08T00:26:59+5:302019-07-08T00:27:03+5:30

अरुण आडिवरेकर। लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्यापासून अवघ्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले. ...

Clandestine police cleared house mud | बंदोबस्तातील पोलिसांनी साफ केला घरातील चिखल

बंदोबस्तातील पोलिसांनी साफ केला घरातील चिखल

Next

अरुण आडिवरेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्यापासून अवघ्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर भेंदवाडीतील लोक जेव्हा वाचलेल्या घरातील चिखल दोन दोन दिवसापासून उपसत होते. त्यावेळी त्यांना कोणीही मदत करत नव्हते. त्याचवेळी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी स्वत:च कपडे काढून घरातील चिखल काढण्यास सुरूवात केली.
धरणफुटीची माहिती मिळताच स्थानिक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दादर पुलावर पाणी आल्याचे सांगताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासमवेत रवाना झाले. तीन दिवस अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड तिवरे येथे होते.
तेथे गेल्यानंतर नातेवाईकांची होणारी गर्दी थांबविण्यासाठी रात्रीच बंदोबस्त ठेवण्यात आला. गावातील एका ग्रामस्थाने व्यक्तींची यादी तयार केली होती. त्यानंतर सरपंचांच्या घरापासून पोलिसांनी कामाला सुरूवात केली. जिल्हा शल्यचिकित्सकांशी बोलून डॉक्टरांचे पथक बोलाविण्यात आले. मृतदेह शोधण्यासाठी गावातील पोहणाऱ्या मुलांबरोबरच कोल्हापूर व अन्य भागातून मुलांना बोलावण्यात आले. त्यानंतर मृतदेहांचे विच्छेदन थांबू नये, यासाठी पहाटेच पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठीदेखील पोलिसांनी मदत केली.
या कामात अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याबरोबरच २०० पोलीस, १२ पोलीस निरीक्षक, २५ ते ३० अधिकारी, उपविभागीय अधिकारी तैनात करण्यात आले होते. या भागातील परिस्थिती आता पूर्ण: नियंत्रणात आली असून, सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या पथकासाठी एक जागा निश्चित करून देण्यात आली आहे. त्याठिकाणाहून त्यांचे कामकाज सुरू असून, वॉकीटॉकीच्या सहाय्याने ते आपल्याशी सतत संपर्कात आहेत. शेवटचा मृतदेह हाती लागेपर्यंत त्यांचे काम सुरूच राहणार असल्याचे विशाल गायकवाड यांनी बोलताना सांगितले.
तांत्रिक बाबी तपासणार
या प्रकारानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी साºया बाबी तपासल्या जाणार आहेत. या बाबी तपासल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या त्यामध्ये दोष होता हे ठोसपणे सिद्ध होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. त्या समितीचा अहवाल, जिल्हाधिकारी यांचा अहवाल तपासून गुन्हे दाखल करण्याबाबत कार्यवाही होणार आहे.

Web Title: Clandestine police cleared house mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.