राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांच्या गाडीला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 07:22 PM2024-04-19T19:22:05+5:302024-04-19T19:22:19+5:30

सुदैवाने कोणतीही दुखापत नाही, गाडीचे नुकसान

Car accident of former Rajapur MLA Ganpat Kadam | राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांच्या गाडीला अपघात

राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांच्या गाडीला अपघात

राजापूर : समाेरून आलेल्या चार ते पाच जनावरांच्या कळपाने राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांच्या गाडीला जाेरदार धडक दिल्याने अपघात झाला. हा अपघात मुंबई-गाेवा महामार्गावरील गाडगीळवाडी येथे बुधवारी (दि.१७) झाला. सुदैवाने यामध्ये काेणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, गाडीचे नुकसान झाले आहे.

माजी आमदार गणपत कदम हे बुधवारी सकाळी मुंबईवरून आपल्या राजापुरातील पन्हळे गावी येण्यासाठी निघाले होते. सायंकाळी महामार्गावर राजापूर गाडगीळवाडी येथे गाडी आली असता महामार्गावर समोरून येणाऱ्या चार ते पाच जनावरांच्या एका कळपाने थेट कदम यांच्या गाडीलाच धडक दिली. मात्र, चालक मनोज देवधर याने प्रसंगावधान राखत गाडी आवरल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, गाडीच्या पुढील व उजव्या बाजूचे नुकसान झाले आहे. माजी आमदार कदम हे सुखरूप असून, त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.

मात्र, या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या जनावरांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे. चाैपदरीकरणानंतर महामार्गावर येणाऱ्या जनावरांचा बंदाेबस्त करण्याची गरज आहे. मात्र, तसे हाेत नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.

Web Title: Car accident of former Rajapur MLA Ganpat Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.