येत्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर सेनेचा भगवा : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 06:51 PM2018-10-25T18:51:58+5:302018-10-25T19:01:50+5:30

रत्नागिरी शहरात भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले ठरणारे थ्रीडी तारांगण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारले जाणार आहे. तारांगणाचे भूमिपूजन या ठिकाणी झाले असून त्याचे उदघाटनही येत्या दीड वर्षात होईल. कामाचा असाच धडाका शिवसैनिकांनी सुरू ठेवावा, म्हणजे येत्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केला.

After the coming elections, the saffron army of Maharashtra: Aditya Thackeray | येत्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर सेनेचा भगवा : आदित्य ठाकरे

येत्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर सेनेचा भगवा : आदित्य ठाकरे

googlenewsNext
ठळक मुद्देयेत्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर सेनेचा भगवा : आदित्य ठाकरेमहाराष्ट्रातील पहिल्या थ्रीडी तारांगणाचे रत्नागिरीत भूमिपूजनठाकरे अ‍ॅक्टीव्हिटी सेंटरचे उदघाटन

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले ठरणारे थ्रीडी तारांगण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारले जाणार आहे. तारांगणाचे भूमिपूजन या ठिकाणी झाले असून त्याचे उदघाटनही येत्या दीड वर्षात होईल. कामाचा असाच धडाका शिवसैनिकांनी सुरू ठेवावा, म्हणजे येत्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केला.

शहरातील माळनाका येथे हे तारांगण १२०० चौरस मीटर क्षेत्रात उभारले जात असून त्यासाठी ५ कोटी ६८ लाख रुपये निधीला पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मंजूरी घेतली आहे. साळवी स्टॉप येथील बाळासाहेब ठाकरे अ‍ॅक्टीव्हीटी सेंटरचे उद्घाटन व नंतर तारांगणाचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.

तारांगणाच्या भूमिपूजनप्रसंगी व्यासपीठावर ठाकरे यांच्यासोबत पालकमंत्री रवींद्र वायकर, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणचे अध्यक्ष आमदार उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरुपा साळवी, सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, सेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, नगराध्यक्ष राहुल पंडित, उपनगराध्यक्ष स्मितल पावसकर, सेनेच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख शिल्पा सुर्वे, तालुकाप्रमुख बंड्या साळवी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, शिवसेना ही केवळ निवडणुकीपुरती नाही तर निवडणुकीत दिलेल्या वचनांना जागणारी आहे, हे वारंवार शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. विकासकामांचे भूमिपूजन झाल्यानंतर त्याचे निर्धारित वेळेत उद्घाटनही होते हेच रत्नागिरीतील अ‍ॅक्टीव्हीटी सेंटरच्या उदघाटनामुळे सिध्द झाले आहे. तारांगणाप्रमाणेच रत्नागिरीत आणखी वेगळा असा ह्यआपले अंगणह्ण प्रकल्प वास्तूरुपाने उभारण्यात यावा. त्यामध्ये सर्व प्रकारच्या तज्ञांना एकत्र येता यावे, नवीन आयडियांचे आदान प्रदान करून त्यातून नवीन प्रकल्प साकार व्हावेत, असेही ठाकरे म्हणाले.

आमदार उदय सामंत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे तारांगणासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी एका टप्प्यात ५ कोटी ६८ लाख निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खासदार विनायक राऊत म्हणाले की, शिवसेना केवळ आश्वासने देऊन थांबत नाही तर त्यांची पुर्तता करते, हे रत्नागिरीतील कामांवरून स्पष्ट झाले आहे. तारांगणासाठी निधीची तरतूद केल्याबद्दल राऊत यांनी पालकमंत्री वायकर यांना धन्यवाद दिले.

रत्नागिरीत शिवसेनाप्रमुखांच्या नावे तारांगण उभे राहणे हे कोकणसाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी भुषणावह आहे. १२०० चौरस मीटर क्षेत्रात होणाऱ्या या तारांगणासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित व आमदार उदय सामंत यांनी जो पाठपुरावा केला त्याबाबत वायकर यांनी त्यांचे कौतुक केले. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अभिजीत गोडबोले यांनी केले.

Web Title: After the coming elections, the saffron army of Maharashtra: Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.