आदित्य ठाकरे २३ रोजी चिपळूण दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 03:47 PM2017-12-20T15:47:52+5:302017-12-20T15:51:18+5:30

शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शनिवार, २३ रोजी चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे यांचे दुपारी मांडवी एक्स्प्रेसने चिपळुणात आगमन होणार आहे. दुपारी १ ते २ या वेळेत स्वामी मंगल कार्यालय, बहादूरशेख नाका येथे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंगसंदर्भात आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करणार आहेत.

Aditya Thakare on 23 th Chiplun tour, organizing various events | आदित्य ठाकरे २३ रोजी चिपळूण दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांचे आयोजन

आदित्य ठाकरे २३ रोजी चिपळूण दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next
ठळक मुद्देजिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला करणार मार्गदर्शन आदित्य ठाकरेच्या उपस्थितीत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचा उद्घाटन सोहळा

चिपळूण : शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शनिवार, २३ रोजी चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आदित्य ठाकरे यांचे दुपारी मांडवी एक्स्प्रेसने चिपळुणात आगमन होणार आहे. दुपारी १ ते २ या वेळेत स्वामी मंगल कार्यालय, बहादूरशेख नाका येथे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंगसंदर्भात आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी २ ते ३ शासकीय विश्रामगृह येथे राखीव, दुपारी ३ ते ४ या वेळेत कापसाळ येथील माटे भोजने सभागृहात आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला ते मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी ४ वाजता भोगाळे येथील मैदानात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचा उद्घाटन सोहळा त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Aditya Thakare on 23 th Chiplun tour, organizing various events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.