रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे ७६६ किलो प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 02:59 PM2018-07-21T14:59:51+5:302018-07-21T15:01:58+5:30

रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शहरात प्लास्टिक बंदी विरूध्द धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या भरारी पथकाने  टाकलेल्या धाडीमध्ये दुकाने, व्यापारी आदी ६६ आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये ७६६ किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त करण्यात आले असून एकाही व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही.

766 kg of plastic seized by Ratnagiri Municipal Council | रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे ७६६ किलो प्लास्टिक जप्त

रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे ७६६ किलो प्लास्टिक जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देरत्नागिरी नगरपरिषदेतर्फे ७६६ किलो प्लास्टिक जप्त१०० पेक्षा अधिक आस्थापनांची तपासणी

रत्नागिरी : नगर परिषदेतर्फे शहरात प्लास्टिक बंदी विरूध्द धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या भरारी पथकाने  टाकलेल्या धाडीमध्ये दुकाने, व्यापारी आदी ६६ आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये ७६६ किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त करण्यात आले असून एकाही व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही.

प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी शहरातून तीन पोती प्लास्टिक नगर परिषदेतर्फे जप्त करण्यात आले होते. धडक कारवाईसाठी दोन भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, बंदी आदेशातील शिथीलतेमुळे कारवाई थांबली होती. परंतु, नगर परिषदेने पुन्हा धडक मोहीम सुरू केली आहे.

शहरातील १०० पेक्षा अधिक आस्थापनांची तपासणी करून ५०० किलो पेक्षा अधिक प्लास्टिक, थर्माकोल जप्त करण्यात आले होते. शुक्रवारी ६६ आस्थापनांची तपासणी करून ७६६ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

भरारी पथकामध्ये श्रेया शिरवटकर, जितेंद्र विचारे, नरेश आखाडे, उत्तम पाटील, आरिफ शेख, संदेश कांबळे, सागर सुर्वे, अतुल पाटील, निरंजन जाधव, प्रीतम कांबळे, जोगेंद्र कांबळे, प्रफुल्ल कांबळे या अधिकाऱ्यांसमवेत आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत.

Web Title: 766 kg of plastic seized by Ratnagiri Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.