बारावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 03:49 PM2019-02-22T15:49:46+5:302019-02-22T15:51:41+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला प्रारंभ झाला. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनीही महाविद्यालयांबाहेर गर्दी केली होती. परीक्षा केंद्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत होता.

21 thousand students from Ratnagiri district for the HSC examination | बारावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार विद्यार्थी

बारावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार विद्यार्थी

Next
ठळक मुद्देबारावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार विद्यार्थी चोख बंदोबस्त : १५५ महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रविष्ठ

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला प्रारंभ झाला. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनीही महाविद्यालयांबाहेर गर्दी केली होती. परीक्षा केंद्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत होता.

रत्नागिरी जिल्ह्यातील १५५ कनिष्ठ महाविद्यालयांतून २१,१४७ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखा ५,५८६ विद्यार्थी, कला शाखा ६,२५८, वाणिज्य शाखा ८,६७० आणि एमसीव्हीसीचे ६३३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९५ कनिष्ठ महाविद्यालयांतून ११,२२६ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखा २,८९५, कला शाखा २,६९३, वाणिज्य शाखा ४,६२७, तर एमसीव्हीसीचे १ हजार ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

बारावी परीक्षेसाठी कोकण विभागात ६० केंद्र असून, त्यामध्ये रत्नागिरीत ३७, तर सिंधुदुर्गमध्ये २३ केंद्र आहेत. २० परीरक्षक केंद्र असून, त्यामध्ये रत्नागिरीत १२ केंद्र, तर सिंधुदुर्गमध्ये ८ परीरक्षक केंद्र आहेत.

परीक्षेसाठी सुमारे एक तास आधीच विद्यार्थी परीक्षा केंद्रावर दाखल झाली होते. विद्यार्थ्यांसमवेत पालकही आपल्या पाल्याचा परीक्षा क्रमांक पाहण्यासाठी मदत करत होते. विद्यार्थ्यांना धीर देण्यासाठी पालकही परीक्षा केंद्राबाहेर उपस्थित राहिल्याने परीक्षा केंद्राबाहेर गर्दी झाली होती. परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना तपासणीनंतरच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात होता.

Web Title: 21 thousand students from Ratnagiri district for the HSC examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.