आजचे राशीभविष्य - 27 मे 2019

By हेमंत बावकर | Published: May 27, 2019 07:31 AM2019-05-27T07:31:24+5:302019-05-27T07:32:17+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's zodiac sign - 27 May 2019 | आजचे राशीभविष्य - 27 मे 2019

आजचे राशीभविष्य - 27 मे 2019

Next

मेष - सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट आणि मित्रांसमवेत वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल. अधिक वाचा

वृषभ - श्रीगणेश सांगतात की नवीन कामाचे नियोजन करणार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरी व्यवसायात लाभदायक परिणाम मिळतील. पदोन्नती होईल. अधिक वाचा

मिथुन - प्रतिकूल घटनांचा योग आल्याने आपल्या कामास विलंब लागेल. शरीरात स्फूर्ती आणि मनात उत्साह असणार आहे. पोटाचे विकार सतावतील. अधिक वाचा

कर्क - श्रीगणेश सांगतात की मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेर खाण्यापिण्यामुळे तब्बेत बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अधिक वाचा

सिंह - पती- पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जीवनसाथीच्या तब्बेतीची चिंता राहील. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहाल. अधिक वाचा

कन्या - शारीरिक, मानसिक स्वास्थ्य राहील. घरात शांती- सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल. आर्थिक लाभ आणि कामात यश मिळेल. आजारातून मुक्त व्हाल. अधिक वाचा

तूळ - श्रीगणेश सांगतात की आज कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग कराल. संततीची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीची भेट रोमांचक ठरेल. अधिक वाचा

वृश्चिक - शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या भीतीचा अनुभव घ्याल असे श्रीगणेश सांगतात. कोणती ना कोणती चिंता सतावेलच. अधिक वाचा

धनु - गूढ रहस्यमय विद्या आणि अध्यात्माकडे आकर्षण राहील. नवीन कार्यारंभास चांगला दिवस आहे. मित्र आणि आप्तेष्टांच्या आगमनाने घरात आनंद राहील. अधिक वाचा

मकर - श्रीगणेश आपली उक्ती आणि कृती यावर संयम ठेवण्याचा सल्ला देतात. कुटुंबात मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. शेअर- सट्टा बाजार यात गुंतवणूक कराल. अधिक वाचा

कुंभ - शारीरिक, मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल. नातलग, मित्र, कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील. स्वादिष्ट भोजन मिळेल. अधिक वाचा

मीन - आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहा असे श्रीगणेश सांगतात. एकाग्रता कमी असेल त्यामुळे बेचैन राहाल. अधिक वाचा

 

Web Title: Today's zodiac sign - 27 May 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.