उल्हासनदी संवर्धनासाठी तरुणांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:34 PM2019-04-24T23:34:40+5:302019-04-24T23:34:50+5:30

उल्हासनदी बचाव मोहीम; पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू

Youth initiative for conservation of Ulhasnya | उल्हासनदी संवर्धनासाठी तरुणांचा पुढाकार

उल्हासनदी संवर्धनासाठी तरुणांचा पुढाकार

Next

- कांता हाबळे 

नेरळ : नेरळ, कर्जत परिसरातील तरुणांनी उल्हासनदी बचाव ही मोहीम हाती घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या दीड महिन्यापासून याबाबत नियोजन सुरू असून, काही भागातील तरु णांनी पुढाकार घेऊन अनेक ठिकाणी नदीपात्रात वाहत आलेली आणि साठलेली जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले आहे, त्यामुळे काही भागात नदीपात्र स्वच्छ झाल्याचे दिसत आहेत. तरु णांनी सुरू केलेल्या या नदीपात्र संवर्धनामुळे तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कर्जत, नेरळ भागातून वाहणाऱ्या उल्हासनदीचा उगम लोणावळा भागातील राजमाची परिसरात होत असून, येथील डोंगराळ भागातून वाहणारे पाणी येथून उल्हासनदीला येऊन मिळते. पुढे या नदीचे पात्र मोठे मोठे होत आहे. या उल्हासनदीत परिसरातील काही भागात सुरू असलेले नवीन बांधकामे तसेच शहरातील मोठ्या प्रमाणात सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने ही नदी जलपर्णीच्या विळख्यात सापडली आहे. ही जलपर्णी गेल्या दोन महिन्यांपासून उल्हास नदीपात्रात वाहत येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे; परंतु याकडे ना प्रशासनाचे लक्ष, ना लोकप्रतिनिधींचे. दोन महिन्यांपासून अनेक भागातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना अवलंबून आहेत; परंतु अनेक पाणी योजनांना फिल्टर प्लँट नसल्याने हे दूषित पाणी घराघरांत जात असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीचा माहोल असल्याने अनेक आदिवासी भागात, शहरी भागात नेत्यांकडून आश्वासनांची खैरात सुरू आहे. ही आश्वासने फक्त निवडणुकीपुरतीच असतात. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून उल्हासनदीच्या काठावर असलेल्या गावांना दूषित पाणी प्यावे लागत आहे, याकडे कुणाचे लक्ष नाही. यासाठी नेरळ परिसरातील तरु णांनी पुढाकार घेतला असून, उल्हासनदी वाचविण्यासाठी नियोजन केले आहे, त्यानुसार काही भागात नदीपात्र स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. वेळ मिळेल तसे तरु ण नदी स्वच्छ करण्याचे काम करत आहेत. तसे नियोजनही त्यांनी केले आहे.

दूषित पात्र स्वच्छ करण्याचे आवाहन
नेरळ, कर्जत परिसरातील तरु णांनी अनेक भागात जाऊन साठलेल्या जलपर्णी असलेल्या भागाची पाहणी केली व त्यानुसार ही जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले आहे. लोकांना स्वच्छ पाणी मिळावे, या हेतूने या मोहिमेस सुरु वात करण्यात आली असून ज्या ज्या गावाजवळ असलेल्या नदीपात्रात जलपर्णी, प्लॅस्टिक नदीपात्रात साचले असल्यास तरु णांनी पुढाकार घेऊन दूषित पात्र स्वच्छ करावे, असे आवाहनही उल्हासनदी बचाव मोहीम ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून कर्जत, नेरळ परिसरातील उल्हास नदीपात्रात जलपर्णी वाहत येत असल्याने परिसरातील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. यावर नियोजन करण्यासाठी व्हाट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला असून, नदी स्वच्छ करण्यासाठी नियोजन सुरू केले असून त्यानुसार काम सुरू आहे. दहिवली व काही भागात नदीपात्र स्वच्छ करण्यात आले असून पुढे ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे. यासाठी परिसरातील अनेक तरु णांनी या मोहिमेत सहभागी व्हावे.
- केशव तरे, ग्रामस्थ, कोदिवले

Web Title: Youth initiative for conservation of Ulhasnya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.