पाण्याचा योग्य वापर करा-लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:54 AM2018-01-19T00:54:27+5:302018-01-19T00:54:30+5:30

पाणी म्हणजे जीवन आहे, पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. पाणी राष्ट्राची संपत्ती आहे, त्याचा योग्य वापर करा, असा महत्त्वपूर्ण सल्ला आमदार सुरेश लाड यांनी कर्जतमधील कार्यक्र मात दिला.

Use the water to suit your needs | पाण्याचा योग्य वापर करा-लाड

पाण्याचा योग्य वापर करा-लाड

googlenewsNext

कर्जत : पाणी म्हणजे जीवन आहे, पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. पाणी राष्ट्राची संपत्ती आहे, त्याचा योग्य वापर करा, असा महत्त्वपूर्ण सल्ला आमदार सुरेश लाड यांनी कर्जतमधील कार्यक्र मात दिला.
कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील घरगुती व बिगर घरगुती ग्राहकांना पाण्याची जलमापके (मीटर) बसविणे या कामाचा उद्घाटन येथील म्हाडा कॉलनीत आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नगराध्यक्षा रजनी गायकवाड, गटनेते राजेश लाड आदी उपस्थित होते.
गटनेते राजेश लाड यांनी मीटरच्या माध्यमातून पाण्याचा गैरवापर टळणार आहे, असे सांगितले. म्हाडा कॉलनीतील इम्रान मुल्ला व जेठाभाई पटेल यांच्या नळजोडणीवर मीटर बसवून कामाचा शुभारंभ झाला.

कर्जत नगरपरिषदेची पाणी योजना लाखो रु पयाने तोट्यात
तोटा भरून काढण्यासाठी आता मीटर पद्धतीने पाण्याचे वाटप
मीटरने पाणीपट्टी आकारणी
अतिवापरावर चाप बसणार
मीटर बसविण्यासाठी व्ही. जे. कन्स्ट्रक्शन कंपनीला ठेका

Web Title: Use the water to suit your needs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.