नाल्यावरील अनावश्यक बांधकामास हरकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:36 AM2018-12-10T00:36:02+5:302018-12-10T00:36:14+5:30

कर्जत नगरपरिषद हद्दीतील करमरकर यांच्या घरापासून ते मुद्रे येथील हायवेपर्यंत कृषी संशोधन केंद्राचे बाजूने सुमारे ५ कोटी रु पये खर्च करून बंदिस्त नाला व त्यावर रस्ता बांधण्यात येणार होता.

Unnecessary construction work on the Nallah | नाल्यावरील अनावश्यक बांधकामास हरकत

नाल्यावरील अनावश्यक बांधकामास हरकत

Next

कर्जत : कर्जत नगरपरिषद हद्दीतील करमरकर यांच्या घरापासून ते मुद्रे येथील हायवेपर्यंत कृषी संशोधन केंद्राचे बाजूने सुमारे ५ कोटी रु पये खर्च करून बंदिस्त नाला व त्यावर रस्ता बांधण्यात येणार होता. असे निर्जन स्थळी नागरिकांकडून कोणतीही मागणी नसताना विकासकाम करण्याचा घाट कर्जत नगरपरिषदेने घातला आहे. मात्र त्याबाबत वकील ॠषिकेश जोशी यांनी हरकत घेतल्याने नाल्याच्या बांधकामास कृषी संशोधन केंद्राकडून हरकत घेण्यात आली आहे.

विठ्ठलनगर परिसरातील करमरकर यांचे घरापासून कृषी संशोधन केंद्रातून नदीपर्यंत जाणाऱ्या नाल्याचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्णमधून नगरपरिषद करत आहे. या कामासाठी ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. नगरपरिषद शासकीय निर्देश विचारात घेत नसल्याने सुमारे ६५ लाख रु पये खर्च करून दिवाणी न्यायालयाच्या आवारातील बाजूला असलेला रस्ता धूळ खात पडला आहे. हे बाब लक्षात घेत कर्जतमधील वकील ॠषिकेश जोशी यांनी नाल्याच्या कामाबाबत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व राज्याचे राज्यपाल यांना ईमेल करून नाल्याचे बांधकाम व त्यावरील रस्त्यास हरकत घेतली आहे.

कर्जतच्या कृषी संशोधन केंद्रात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संशोधन प्रकल्प सुरू असून या क्षेत्रात कोणतेही अकृषिक काम करण्यात येऊ नये असे शासकीय निर्देश महाराष्ट्र शासनाने काढले आहेत. त्याकडे नगरपरिषदमधील बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे, असे जोशी यांनी सांगितले. तसेच देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जमिनीवर आणि पिकावर  काँक्रीटीकरणामुळे पाणी तुंबून परिणाम होऊ शकतो याबाबत चिंता व्यक्त केली होती. जोशी यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधक संचालक यांनी या कामाबाबत हरकत घेतली आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावरून वाहणाºया मुख्य नाल्याचे काम अर्धवट आहे, मग ज्याची गरज नाही तो नाला बांधण्याची घाई का?
- ऋषिकेश जोशी, वकील

Web Title: Unnecessary construction work on the Nallah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड